नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या भेटीला येत आहे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत
राहुरी ( प्रतिनिधी )
असा क्वचितच व्यक्ती असेल ज्याला हे गीत माहिती नसेल... मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा
होय सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचेच हे गीत आहे . आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच येत्या शुक्रवारी सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत राहुरीत येत आहेत .
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले प्राथमिक , माध्यमिक ( मराठी व इंग्रजी माध्यम ) व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त वार्षिक पारितोषिक समारंभ व मातृदिन समारंभाचे शुक्रवार दि. 3 जानेवारी 2025 रोजी आयोजन केले आहे .
या समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील हे भूषविणार असून सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची या समारंभाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
या पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य अरुण तुपविहीरे यांनी केले असून विद्यालयाचे संचालक मंडळ , प्राध्यापक व शिक्षक वृंद विद्यार्थी प्रतिनिधी व पालक यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे .
सुप्रसिद्ध कवी व मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या शुभेच्छा गीताचे जनक कवी अनंत राऊत हे यांची प्रमुख उपस्थिती असल्याने नव्या वर्षात नव्या वर्षाची सुरुवात मात्र गोड होणार आहे हे नक्कीच .

Post a Comment
0 Comments