सुरत - नाशिक - हैद्राबाद , नगर - शिर्डी कोपरगाव रस्त्याचे ..... दारिद्र्य कायम
अहो हे पाप कोणाचे ? शेकडोचा बळी गेल्यानंतरही रस्ते विकास दारिद्र्य कायमच !
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त
नगर जिल्ह्यातील दोन महामार्गांचे सध्या दारिद्र्याचे वर्णन सर्वश्रुत व जगजाहीर झाले आहे . त्यातील एक नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग आणि बहुचर्चित संभाव्य सुरत- हैदराबाद ग्रीनफिल्ड हायवे .
जगभरात नजर लागावी असे हे संभाव्य महामार्ग असले तरी सध्या हे दोन्ही विषय दारिद्र्यरेषेखाली आहेत काय असे चित्र आहे .
गेल्या शिर्डी शिंगणापूर या आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन क्षेत्राला तसेच दक्षिण व उत्तरेकडील राज्यांना जोडणाऱ्या नगर कोपरगाव शिर्डी कोपरगाव या महामार्गाची साडेसाती गेल्या काही वर्षांपासून कायम आहे .
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत देशभरातील रस्ते सुधारले , मात्र त्यांच्या मंत्रालयाकडून नगर जिल्ह्यातील हा महामार्ग जणू काळा डाग ठरला आहे . नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याच महामार्गाच्या कामाबाबत माहिती दिली आहे .
बंगळुरू शिर्डी या मालवाहतूक व पर्यटन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी नगर राहुरी शिर्डी कोपरगाव या मार्ग ऐवजी सोलापूर तुळजापूर बीड औरंगाबाद बेळगाव कोल्हापूर कराड सातारा पुणे चाकण संगमनेर लोणी व होस्पेट सोलापूर येरमाळा बीड पाचोड औरंगाबाद शिर्डी या मार्गाचा अवलंब केल्याचे केला आहे .
हैदराबाद रूट मध्ये हैदराबाद शिर्डी या रूट साठी सांगा रेड्डी हुमनाबाद नळदुर्ग सोलापूर बीड जालना शिर्डी आणि हुमनाबाद बसवकल्याण उमरगा औरंगाबाद शिर्डी या मार्गाचा अवलंब केला आहे तर मध्य प्रदेशातील इंदूर पुणे या रूट साठी इंदोर बालघाट शिरपूर धुळे चांदवड नाशिक संगमनेर सिन्नर पुणे तर इंदोर महू सैंधवा धुळे मालेगाव संगमनेर असा मार्ग निश्चित केला आहे .
बहुतेक कंपनी प्रवासी व प्रवाशांना सेवा देणाऱ्या व्यक्ती संस्था यांच्याकडून हीच माहिती दिली जात असल्याने पर्यटन मालवाहतूक करणाऱ्या मी आपापले मार्ग केव्हाच वळवली आहेत .
दक्षिणेकडील राज्यांना उत्तरेशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असणाऱ्या अहिल्यानगर मनमाड मार्गांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे.
त्यामुळे अनेक प्रवासी तसेच मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी हा रस्ता मार्ग वगळून पर्याय मार्गाने वाहतूक सुरू केली आहे.
सदर घटनेमुळे अहिल्यानगर कोपरगाव या मार्गावरील अनेक हॉटेल्स, गॅरेज, पेट्रोल पंप व इतर व्यावसायिक ज्यांचे दैनंदिन जीवन या रस्त्याच्या दळणवळणावर अवलंबून होते त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. दक्षिणेकडून शिर्डी व इतर देवस्थानांना भेट देणाऱ्या भक्तांनी आता पुणे संगमनेर शिर्डी किंवा सोलापूर बीड औरंगाबाद शिर्डी या पर्यायी मार्गाचा वापर सुरू केल्यामुळे सहाजिकच नगर मनमाड मार्गावरील वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे सदर रस्तेमार्गाने मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतुकीचे दर वाढले आहे याचा परिणाम विद्यार्थी नोकरदार व शेतीमाल दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर होत आहे. आता केंद्रात व राज्यात भाजप प्रणित डबल इंजिन सरकार असल्याने लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा ही जनतेची इच्छा आहे. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे होईल तेव्हा होईल पण आता नगर मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेमुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहे तसेच येथील व्यवसायावर परिणाम होऊन जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मोबाईलवर दिशा दाखवणारे मॅप सुद्धा आता अहिल्यानगर कोपरगाव या मार्गा ऐवजी इतर मार्ग सुचवत आहे.
अशाच पद्धतीने 2016 या काळात बहु चर्चेत असलेल्या अशा सुरत नाशिक नगर सोलापूर हैदराबाद या ग्रीन फिल्ड हायवे ची निविदा निघाली होती त्यानंतर भूसंपादन व अन्य गोष्टींमध्ये साडेसातीचा काळ उलटून गेला आहे साडेसात वर्षानंतरही या ग्रीनफिल्ड हायवेचे घोंगडे भिजत पडलेले आहे त्यामुळे राष्ट्रीय रस्ते व वाहतूक विभागाच्या कार्यक्षमता व कामा मुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उपेक्षा कायम आहेत त्याकडे ना कोणी लोकप्रतिनिधी ना केंद्राचे नाराज्याचे अधिकारी यांचे लक्ष यांचे दुर्लक्ष कायम असल्याचे आरोप केले जात आहेत आता काय होणार याची चर्चा वर्षानुवर्षे सुरूच राहणार काय आणि शेतकरी व प्रवाशांचे हकनाक बळी जाणार काय हा संताप जनक प्रश्न विचारला जात आहे






Post a Comment
0 Comments