Type Here to Get Search Results !

राहुरी फॅक्टरीत बंद पाळून निषेध

 राहुरी फॅक्टरीत बंद पाळून निषेध



राहुरी फॅक्टरी


परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती विटंबना प्रकरणी परभणी शहर बंद केले असता भीमसैनिकांना अटक करण्यात आले.यातील भीमसैनिक आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी हा न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा आज राहुरी फॅक्टरी शहरात बंद पाळून निषेध करण्यात आला. आरपीआय आठवले गटाच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते.


राहुरी फॅक्टरी आरपीआय शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे व कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी फेरी काढून व लाऊडस्पीकर माध्यमातून भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू घटनेच्या निषेधार्थ दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.व्यापाऱ्यांनी या आवाहनास प्रतिसाद देऊन आज मंगळवारी दुकाने बंद ठेवण्यात आली.राहुरी फॅक्टरी नाका, बस स्टॅन्ड परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प होते.

Post a Comment

0 Comments