राज्यातील सराफ - सुवर्णकारांसंदर्भात विधानपरिषदेमध्ये कोण काय म्हटले
सतर्क खबरबात विशेष टीम - नागपूर
राज्यातील सुवर्णकारांबाबत प्रथमच चित्राताई वाघ यांनी विधान परिषदेत आज आवाज उठवल्याने राज्यातील सराफ व्यावसायिकांमध्ये समाधान निर्माण झाले आहे .
विधान परिषदेत आमदार चित्राताई वाघ यांनी विधान परिषदेतील कामकाजात राज्यातील सुवर्णकार सराफ व्यावसायिकांच्या संबंधात बहुआयामी असे निवेदन सादर केले .
आमदार चित्राताई वाघ यांनी सभागृहात सुवर्णकार समाजाच्या प्रश्नाबाबत म्हटले की , राज्य सरकारने नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली . त्याची पुढील अंमलबजावणी सुरू करावी , तसेच आयपीसी 411 , 412 च्या सध्याच्या बीएमसी 317 कलमासंदर्भात बहुतांश सराफ व्यापारी बिलाशिवाय सोनी मोड खरेदी करत नाहीत. काही वेळेस नजर चुकीने सोने खरेदी केली जाते . ज्यामुळे त्या व्यापाऱ्याला त्रास होतो . म्हणून 14 मार्च 2024 रोजीच्या शासनाच्या काढलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा व राज्यस्तरीय दक्षता समिती गठन करण्यासंदर्भात दिलेल्या सूचनानुसार त्वरित अंमलबजावणी करावी .
तसेच रिकवरी अधिकारी नव्हे तर चौकशी अधिकारी असावा .
मुंबई पुणे नाशिक गोल्ड क्लस्टर निर्माण करावे. सोने तारण, विविध बँकांच्या सोने तारणासाठी गोल्ड व्हॅल्यूवर सोने तारण या यामध्ये पुढाकार घ्यावा , अशी मागणी आमदार चित्राताई वाघ यांनी विधान परिषदेत केली .
दरम्यान गोल्ड व्हॅल्यू वर असोसिएशन राज्यसभा सुवर्णकार संघटना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विविध स्थानिक सराफ सुवर्णकार संघटना आज पर्यंत अनेक विषयांसाठी राज्यस्तरापर्यंत आपल्या प्रलंबित मागण्या मांडत असताना आता विधान परिषदेमध्ये चित्राताई वाघ यांच्या रूपाने आमदार लाभल्याने सराफ सुवर्णकार , कारागीर यांच्या साठी आमदार चित्राताई वाघ या पुढाकार घेत असल्याने राज्यातील सराफांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असल्याचे चित्र आहे .


Post a Comment
0 Comments