फार्महाऊस मधील कामगारास धारधार शस्त्राचा धाक दाखवून 400 किलो लिंबाची चोरी करणारे चार जणांची टोळी राहुरी पोलिसांकडून अटक
गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यार व चोरी केलेले चारशे किलो लिंबाचा शोध सुरू
माननीय न्यायालयाने दिली तीन दिवस पोलीस कस्टडी
राहुरी ( प्रतिनिधी )
मल्हारवाडी येथील शेतकरी शिवाजी जनार्दन सागर यांच्या ताहाराबाद येथील फार्म हाऊस वर 15 जानेवारी 2025 रोजी पहाटेच्या सुमारास कामगाराला धाक दाखवत अज्ञात चोरट्यांनी लिंब चोरून नेल्याची घटना घडली होती .
राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 26/2025 BNS 331(6),305(a),351(2),3(5). प्रमाणे दाखल असून यातील आरोपीत मजकूर यांनी दिनांक 15/01/2025 रोजीचे पहाटे 03/45 वाजता ताहाराबाद गावचे शिवारीतील फिर्यादीचे शेतामधील फार्म हाऊस मध्ये असणारे कामगारास धारधार शास्त्राचा धाक दाखवून धारदार शस्त्राने फार्म हाऊसचे कुलूप तोडून चारशे किलो लिंबाची चोरी केली होती सदरची चोरी करणारे आरोपी नामे 1)विजय भिकाजी झावरे 2)अनिल उत्तम विधाते 3)चंद्रकांत मोहन बर्डे 4)ज्ञानेश्वर दादा घनदाट सर्व राहणार ताहाराबाद तालुका राहुरी यांना राहुरी पोलिसांकडून अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यातील आरोपी यांना मा न्यायालयाकडे हजर करून चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड ची मागणी मा. न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री परबत यांनी बाजू मांडल्याने माननीय न्यायालयाने आरोपीं क्रमांक एक ते तीन यांना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली असून आरोपी क्रमांक चार यास मेजिस्ट्रेट कस्टडी रिमांड दिली आहे.
सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार हत्यार व 400 किलो चोरीस गेलेल्या लिंबाचा तपास चालू आहे पुढील तपास पोहेकॉ/जानकीराम खेमनर करत आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ,पोहेकॉ जानकीराम खेमनर,रामनाथ सानप, पोना/जालिंदर साखरे, पोहेकॉ/शकुर सय्यद पोकॉ/अविनाश दुधाडे यांनी केली.

Post a Comment
0 Comments