Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या कॅलेंडरची सध्या चर्चा

 या दिनदर्शिका ( कॅलेंडर ) ची शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा



सतर्क खबरबात टीम - विशेष वृत्त


                         ( दूध व दुग्धजन्य पदार्थ )

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने प्रकाशित केलेल्या यंदाच्या दिनदर्शिका राज्यमाता गोमातेवर आधारित देशी गाईच्या विषयी सचित्र माहिती 







सध्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आकर्षण बनले आहे .


                ( महाराष्ट्र , भारतातील देशी गायी )

 महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध घडी पत्रके , दिनदर्शिका , डायरी व अन्य उत्पादने प्रकाशित केली जातात . ती शेतकऱ्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरतात . दिनदर्शिका प्रत्येक महिन्यातील शेतीविषयक करावयाच्या कामांची व सूचनांची माहिती शेतकऱ्यांसाठी दिली जाते .


( औषधी वनस्पती उद्यान )



                               ( चारा व गवत )

 यावर्षी विद्यापीठाच्या पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने आकर्षक अशी बारा पानांची दिनदर्शिका राज्यमाता गोमाता वरील देशी गाईंच्या सचित्र माहितीवर प्रकाशित केली आहे .


                ( गोवंश भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान )

या बारा पानांच्या दिनदर्शिकांच्या छायाचित्रांसह देशी गाई , गोमातेवरील दुग्धजन्य पदार्थ , उपपदार्थ , देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील दूध व दुग्धजन्य पदार्थांची माहिती , गोमय , गोमुत्र प्रक्रिया व सोलर युनिट ( पॉवर गोठा ) , विद्यापीठाने विकसित केलेले चाऱ्याचे व गवताचे विविध वाण , मूरघास उत्पादन , औषधी वनस्पती , गाईंचे - गो वंशाचे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान , विविध विषयावरील प्रशिक्षण , पशुपालन व्यवस्थापन ॲप्स व तंत्रज्ञान , आदि विषयी सचित्र माहिती दिलेली आहे .


सरकारने राज्य माता गोमाता म्हणून नुकतेच जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची मार्गदर्शक अशी दिनदर्शिका शेतकऱ्यांचे आकर्षण बनल्याचे चित्र आहे .

Post a Comment

0 Comments