सराला बेटाचे महंत रामगिरी यांनी दिला उंबरे येथे पुन्हा इशारा
उंबऱ्यात छत्रपती पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न
राहुरी ( प्रतिनिधी )
ब्राम्हणीत धर्मांतराची, उंबरेत लवजिहादची घटना घडली. गुहात कानिफनाथांच्या मंदिरावर दावा केला, अन्याय सहन करणे हे देखील पाप आहे. त्यामुळे आतातरी हिंदुनी जागे होण्याची गरज आहे. वणीच्या सप्तशृंगीची, मढीच्या कानिफनाथांची, नेवासाच्या नारद मुनी मंदिराचीहू जागा ही हिंदू देवस्थानचीच आहे, जर शासनाने किंवा प्रशासनाने कोणी तिथे वक्फ बोर्डाचं नाव लावण्याचा, ताबा घेण्याचा प्रयत्न केला तर, हिंदु समाजासोबत आम्ही साधू संत देखील रस्त्यावर उतरू, असा इशारा हिंदू धर्मरक्षक महंत रामगिरीजी महाराज यांनी सरकारला दिला.
उंबरे येथे छत्रपती प्रतिष्ठान आयोजित पुरस्कार वितरण प्रसंगी महंत रामगिरी महाराज बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच संतोष ढोकणे तर व्यासपीठावर आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, डॉक्टर सतीश सोनवणे, अॅड. राहुल करपे, रेणुका माता मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत भालेराव, साई संस्थांनचे माजी विश्वस्त सुरेशराव वाबळे, साई आदर्शचे शिवाजीराव कपाळे, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे मार्गदर्शक संजय कडूस, तनपुरे कारखान्याचे संचालक सुनील आडसुरे, सरपंच सुरेशराव साबळे आदी उपस्थित होते.
यावेळी महिला सबलीकरण क्षेत्रात आमदार मोनिकाताई राजळे, युवा आयडॉल आमदार विक्रम पाचपुते, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. सतीश सोनवणे, उत्कृष्ट कायदे तज्ज्ञ अॅड. राहुल करपे, उद्योजक म्हणून गणेश शिंदे, दैनिक पुढारीचे वृत्तसंपादक दीपक रोकडे, बेस्ट रिपोर्टर म्हणून जेऊरचे शशिकांत पवार यांसह कुणाल जायकर, आदिनाथ घुगरकर, डॉ. प्रतिभा खाबिया, रवींद्र ढोकणे, अशोक पागिरे, दिलीप गायकवाड, भाऊसाहेब काळे, संगीता कुरकुटे, बाळासाहेब खुळे, आदींसह सहकारातील आदर्श संस्था म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी, आदर्श ग्रामपंचायत ‘कानडगाव’ यांना रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते छत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी आ. राजळे यांनी सराला बेट आणि महाराजांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढताना त्यांच्या हस्ते छत्रपती पुरस्कार स्वीकारताना मोठा आनंद होत असल्याचे सांगितले. तर आमदार पाचपुते यांनी हिंदू मंदिराची जागा वक्फ बोर्डाला घेवू देणार नाही. सरकार संवेदनशील असल्याचे सांगून पुरस्काराबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले. यावेळी डॉ. सतीश सोनवणे, अॅड. राहुल करपे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रतिष्ठानचे आकाश साबळे, अक्षय जरे, दत्ता पवार, निशांत आलवणे, तेजस काळे, गोरख ढोकने, भारत धोंडे, राहुल वाव्हल, ऋषी काळे, नीलेश ढोकने व शंभु राजे ग्रुप उंबरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक विद्याताई करपे, स्वागत विलास ढोकणे, दीपक पंडीत, तर सूत्रसंचालनआप्पासाहेब ढोकणे यांनी केले.


Post a Comment
0 Comments