Type Here to Get Search Results !

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत फेब्रुवारीत शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत फेब्रुवारीत शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन



राहुरी  ( प्रतिनिधी )

सहकार चळवळीला नवी दिशा मिळावी, तसेच सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या विश्वासावर गती मिळावी, यासाठी शिर्डी येथे ८ व ९ फेब्रुवारी २०२५ या दोन दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला सहकार मंत्री अमित शहा यांचीही उपस्थिती लाभणार असल्याची माहिती  फेडरेशन ऑफ मल्टिस्टेटचे अध्यक्ष सुरेश वाबळे  यांनी दिली.



दरम्यान, या परिषदेसाठी अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका, फिलीपाईन्स, नेपाळ, मंगोलिया व कोरीया हे आठ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे राज्य पतसंस्था फेडरेशन संचालक शिवाजीराव कपाळे, वासुदेव काळे यांनी सांगितले.


आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या पार्श्वभुमीवर राहुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना वाबळे म्हणाले, आंतरराष्ट्रीय देशांची संघटना असलेल्या युनायटेड नेशन्स ऑर्गनायजेशन (युनो) ने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार घोषित केलेले आहे. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ ही जगातील सर्वात मोठी चळवळ आहे. 


या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे स्वागत तसेच या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात भरगच्च कार्यक्रम महाराष्ट्रात साजरे व्हावे, या दृष्टीने राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वपूर्ण निर्णय 8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी सहकारी पतसंस्थांची आंतराष्ट्रीय परिषद महाराष्ट्रात संपन्न व्हावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. 


शिवाजीराव कपाळे म्हणाले की, पहिल्या दिवशी 8 रोजी युवक परिषदेचे उद्घाटन माजी खासदार डॉ. सुजय विखे  यांच्या हस्ते   उद्घाटन होणार असून स्वागताध्यक्ष पद पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भूषविणार आहेत. दुसर्‍या दिवशी ९ फेब्रुवारीला सहकाराचे खुले अधिवेशन संपन्न होणार आहे. सहकारी पतसंस्था चळवळीतील तज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली असल्याचे सांगितले. 


या परिषदेनिमित्ताने सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. पहिली दिंडी मुंबईतील वयशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाला अभिवादन करून सहकाराचे चळवळीचे जनक स्व. धनंजयराव गाडगीळ तर, दुसरी दिंडी सहकाराचे जनक स्व. वैकुंठभाई मेहता यांच्या नावाने नगरमध्येे येईल. आशिया खंडातील पहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना असलेल्या लोणी -प्रवरानगर पद्मश्रींच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करत या दोन्ही दिंडीचा संगम होईल. त्यानंतर दोन्ही दिंडी शिर्डीकडे प्रस्थान करतील व परिषदेत सहभागी होणार आहे .सहकारात युवकांचा अधिकाधिक सहभाग असावा, म्हणून या परिषदेचे  तर महिलांनाही सहकार चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी ‘सहकार सम्राज्ञी’ ही स्पर्धा घेतली जाणार आहे.  या  परिषदेस उपस्थित रहावे असे वासुदेव काळे  यांनी केले आहे. यावेळी  बाळासाहेब उंडे, शामराव निमसे, प्रकाश पारख, डॉ.महेश कोहोकडे, डॉ.देवकाते, कांचन पानसंबळ, शिवाजी आरंगळे तालुक्यातील विविध पतसंसस्थेचे पदाधिकारी, अधिकारी आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments