राष्ट्रीय मतदार दिनी मल्हारवाडी गावाचा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान
राहुरी ( प्रतिनिधी )
राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम २०२५ वर्ष १५ व्ये अंतर्गत विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मधील मिशन ७५ या उपक्रमामध्ये अहिल्यानगर जिल्हातील २२३ राहुरी-नगर-पाथर्डी विधासभा मतदार संघातील आमच्या मल्हारवाडी गावाने सर्वाधिक जास्त मतदान टक्केवारी गाठल्याबदल आमच्या मल्हारवाडी गावाला लोकशाहीचे शिल्पकार हा पुरस्कार आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय श्री सिद्धराम सालीमठ साहेब, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री राकेशजी ओला साहेब, महानगरपालिका आयुक्त श्री डांगे साहेब तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातल सर्व उच्चपदस्त अधिकारी यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पारितोषिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
यावेळी गावचे युवा सरपंच व उद्योजक श्री मंगेश भाऊ गाडे, सोसायटी सदस्य सुधिर आप्पासाहेब गावडे, तलाठी भाऊसाहेब श्री उमेशजी पवार, गावचे ग्रामसेवक सौ. गीतांजली गोसावी मॅडम हे उपस्थित होते
लोकशाहीचे शिल्पकार या पुरस्कार राहुरी तालुक्यातील डोंगरी भागात येणारे एक छोटेसे खेडे आमचे मल्हारवाडी गावाला मिळण्यासाठी जी मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त होण्यासाठी जे शासकीय अधिकारी, सर्व कर्मचारी असतील किंवा गावचे सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व आजी-माजी सरपंच, सदस्य सोसायटी सर्व आजी-माजी चेअरमन, संचालक आणि सर्वात महत्वाचे गावातील सर्व ज्येष्ठ, वयस्कर, माता भगिनी, नवीन तसेच सर्व मतदार यांचा सर्वांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांसाठी मल्हारवाडी गावांसाठी मिळालेल्या लोकशाहीचे शिल्पकार हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.


Post a Comment
0 Comments