Type Here to Get Search Results !

राहुरीत दिव्यांगासाठी कॅलिबर व इम्पॉरटेन कृतीम पाय वाटप कार्यक्रम संपन्न

 राहुरीत दिव्यांगासाठी कॅलिबर व इम्पॉरटेन कृतीम पाय वाटप कार्यक्रम संपन्न



राहुरी  ( प्रतिनिधी ) 

विस्टीऑन नम्मा आशा किरण चॅरिटेबल ट्रस्ट व दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी तथा राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ब्रँडेड कंपनीचा इम्पोर्टेड कृत्रिम पाय व कॅलिपर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 


कार्यक्रमाचे उद्घाटन श्री प्रभू राऊत साहेब (विस्टीऑन हेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट)श्री धर्मेंद्र सातव साहेब राज्यध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 



  प्रमुख उपस्थितीत सिद्धार्थ बांगर (नम्मा आशा किरण चॅरिटेबल ट्रस्ट ) श्रीमती अश्विनी बनसोडे,श्रीमती समीक्षा एस, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब, अ.नगर येथील श्री राजीव शिंदे सर जिल्हा संपर्क प्रमुख पांडुरंग कासार प्रमुख उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी प्रास्ताविक केले यामध्ये प्रहार दिव्यांग संघटना तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली संस्थेच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम दिव्यांगाच्या फायद्यासाठी राबवले जातात. प्रभू राऊत साहेब म्हणाले यापुढेही दिव्यांगा बांधवांसाठी विस्टीऑन कंपनी मार्फत काम करत राहू अशी ग्वाही दिली यावेळी 30 दिव्यांग बांधवांना इम्पॉर्टंट कृत्रिम पाय व कॅलिबर वाटप करण्यात आले . राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव साहेब म्हणाले नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल दिव्यांगासाठी फार मोठा लढा उभारण्याची गरज आहे बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत 130 शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग कासार तालुकाध्यक्ष योगेश लबडे यांची भाषणे झाली. यावेळी सूत्रसंचालन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे यांनी केले कंपनीच्या वतीने आलेले दिव्यांग पुनर्वसन केंद्र माहीम ( मुंबई ) चे अध्यक्ष श्री शेरसिंग राठोडसाहेब कॅलिबर चे प्रात्यक्षिक करून दिव्यांग बांधवांना पाय बसवले.यावेळी श्रीगोंदा तालुका अध्यक्ष राजेंद्र पोकळे , नगर शहराध्यक्ष संदेश रपारिया तालुका सचिव दत्तात्रय खेमनर तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी मूकबधिर संघटना तालुका अध्यक्ष वेनुनाथ आहेर, तालुका कार्याध्यक्ष सुरेश दानवे, शाखाध्यक्ष नानासाहेब खपके , अनामिका हरेल, तालुका संघटक भास्कर दरंदले, कैलास हारदे,भरत आढाव, बाळासाहेब गांडळ, चंद्रकांत रेबडे कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले उपस्थित पाहुण्यांचे आभार शाखाध्यक्ष विजय म्हसे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments