म्हैसगावमध्ये सरपंच सुजाता अरुण पवार व पती अरूण पवार यांची ग्रामसभेत नागरिकांना दादागिरी करण्याचा ग्रामस्थांचा आरोप
राहुरी ( प्रतिनिधी )
म्हैसगामध्ये 26/1/2025 रोजी ग्रामपंचायत ग्रामसभा सरपंच सुजाता अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती . सरपंच पतीने ग्रामसभा उधळून लावल्याचा आरोप केला जात आहे.
प्रत्येक कामात नेहमी अडथळे हा सरपंच पती करत आहे, यांनी गावाला पूर्ण वेठीस धरले आहे.मी जे सांगन तेच होणार.तुम्हाला काय करायचे ते करा अशी दादागिरी करत आहे.
सरपंच ग्रामसभेची अध्यक्ष असताना चालु ग्रामसभेत अरुण पवार यांनी सरपंच व ग्रामसेवक शकिला पठाण यांना ग्रामसभेतून उठून जाण्यासाठी भाग पाडले. ग्रामसभा अरूण पवार यांनी उधळून लावली . नागरिकांनी अनेक प्रश्न घरकुलांचे, गावातील नागरिकांचे आरोग्य, रस्ते,गेली दोन वर्षापासून बाजार लिलावाचे पैसे ग्रामपंचायत कडे जमा नाही ते लिलाव धारक कधी भरणार,जमा खर्चाची रक्कम सांगा, गावातील व्यवसायिकांना विनाकारण बोगस नोटीस देऊन हुकुमशाही पध्दतीने कार्यवाही का करतात असे अनेक प्रश्न नागरिक म्हणून ग्रामस्थ बोलत होते . ते विषय मंजूर करण्यात यावे असे नागरिक बहुमताने मांडत होते. पण सरपंच व पती अरूण पवार हे कोणाचेही ऐकत नव्हते, म्हैसगामध्ये सरपंच पती हा उपसरपंच सदस्य यांना मासिक मिंटीग नेहमीच अडथळा निर्माण करत आहे.गावातील अनेक कामे बंध पाडले आहे.तरी सरपंच व पती व ग्रामसेवक हे संगनमताने वागतात, कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना व उपसरपंच ना विचारत घेत नाही. नागरिकांचे कोणतेच प्रश्न सुटत नाहीत .गावात व ठाकरवाडी मध्ये पाण्याची व लाईटची खुप बेकार अवस्था झाली आहे , सरपंच सुजाता अरुण पवार पती अरून पवार च्या मनमानीला ग्रामस्थ पूर्ण कंटाळले आहेत.गावाला एक चांगला दबंग ग्रामसेवक यांची फार गरज आहे.तरी सध्या चे ग्रामसेवक हे फक्त सरपंच व पती अरूण पवार यांचेच ऐकतात, शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते. त्यांचे कोणतेही प्रश्न सोडवले जात नसल्याने गावातील नागरिकांचे निराश होत होते.गावातील विकास आराखडा प्रमाणे कामे करत नाहीत.सरपंच आपल्या जवळच्या व्यक्तीला बाजार लिलावाचे देवुन सन- 2023 व 2024 चे 90000+90000 हाजार =180000 ते पैसे ग्रामपंचायत खात्यावर जमा न करता परस्पर सरपंच पती यांनी संगनमताने मोठा अपहार केला असल्याचा आरोप केलाआहे .ते पैसे ग्रामपंचायत खात्यावर लवकरात भरणा करा.असे ग्रामसभेत नागरिकांनी मागणी केली.असता सरपंच पती चालू ग्रामसभा बंद करू पोलीस अधिकारी समोर ग्रामस्थांवर दादागिरी हुकुमशाही करून सरपंच सुजाता अरुण पवार व पती अरूण पवार यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्यावर दबाव आणत चालू ग्रामसभा उधळून लावली व निघुन गेले .
वरिष्ठांनी म्हैसगाव ग्रामपंचायत मध्ये लक्ष देण्याची खुप गरज आहे.तर ग्रामसभा पुन्हा घेण्यात यावी.अशी नागरिकांची मागणी केली आहे. पुढील ग्रामसभेसाठी पंचायत समितीचे बिडीवो व तहसीलदार यांनी यावे ही ग्रामस्थांची मागणी आहे.लोकशाही राजवटीत महीला सरपंच असतांना व ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंच पतीने ढवळाढवळ केली नाही पाहिजे, ज्यांना नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत त्यांना निरपेक्ष वृत्तीने काम करू दिले पाहिजे . घरातील व्यक्तिने ग्रामपंचायत कारभारात ढवळाढवळ केली नाही पाहिजे. अशी मागणी ग्रामसभेत नागरिकांनी बहुमताने मांडली.



Post a Comment
0 Comments