अभिनेता प्रमोद पंडित यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
राहुरी / लोणी ( प्रतिनिधी )
नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक श्री प्रमोद पंडीत यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियन अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली .
नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील प्रमोद पंडीत अभिनेता दिग्दर्शक,( अपंग सेवादल अध्यक्ष ) यांना जोगेश्वरी अंधेरी येथे दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित म्हामुनकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले .
प्रमोद पंडीत अभिनेता दिग्दर्शक यांचे निवडीबद्दल पाथरे बुद्रुक , पंचक्रोशीतून तसेच लोणी येथील त्यांचे हितचिंतकांमधून अभिनंदन करण्यात आले .

Post a Comment
0 Comments