संताजी महाराजांचे कार्य अलौकिक - सभापती अरुण तनपुरे
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी शहरात सालाबाद प्रमाने तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली , तसेच मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले .
या प्रसंगी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अरुणसाहेब तनपुरे होते . तसेच महाराष्ट्रातील सर्व तेली समाजाच्या प्रत्येक घरातारत पोहचलेले स्नेहिजण दिनदर्शिकेचे आनावरण हि आदरणीय श्री.अरुणसाहेब तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्या प्रसंगी संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संताजी महाराजांचे कार्य अलौकिक असुन त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावे असे गौरवोद्गार तनपुरे यांनी काढले.संताजी महाराज फक्त एका समाजापुरते मर्यादित नसून सर्वानाच त्यांचा अभिमान आहे त्यांच्या लेखनीतुनच आपण आज गाथा वाचु शकतो तेली समाजाला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
प्रशासनाच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस मा.श्री.संजयजी ठेंगे यांनीही संताजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
या प्रसंगी समाजाचे मा.नगराध्यक्ष आसारामभाऊ शेजुळ,मा.नगरसेविका मुक्ताताई करपे,मा.एकनाथ तनपुरे ,मा.रविद्र कोरङे,मा.वाय.एस.तनपुरे मा.अशोक आहेर प्रमुख उपस्थितीत होते .
उपस्थितीत मान्यवरांचा समाज्याच्या वतीने सन्मान करण्यात आला .शहरातुन भव्य अशी मिरवणुक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आली महिलांनी मनमुराद फुगङीचा आनंद लुटला संताजी महाराजांच्या वेशभुषेत चि.सोहम संदिप सोनवणे साकारण्यात आले शहरातील ठिक ठिकाणी सङा रांगोळी काढुन विवीध मंङळाच्या वतीने संताजी महाराज प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले भक्तिमय वातावरणात शहरातील परिसर दानानुन गेले होते .
या वेळी समाजभूषण ह.भ.प.नामदेव महाराज शेजुळ यांच्या अमृतवाणीतुन संताजी महाराजांचे चरित्र माहिती सांगण्यात आली.
त्या प्रसंगी समाजाचे जेष्ठ समाज सेवक गंगाधर शेजुळ,दत्तात्रय इंगळे,वसंतराव लोखंडे,वसंतराव इंगळे,सिताराम लोखंडे,,मोहन करपे,अशोक शेजुळ,सदाशिव पवार सर,निवृत्ती महापुरे,भागवत देवरे,तेली समाज तालुकाध्यक्ष दत्तात्रय सोनवणे,शहराध्यक्ष,संजय पन्हाळे,शरद इंगळे,सुरेश धोत्रे,बाळासाहेब शेजुळ,बाबासाहेब शेजुळ,निलेश इंगळे,आण्णासाहेब इंगळे ,व्यवहारे साहेब,राजेद्र इंगळे,चंद्रकांत देवकर,शेजुळ,भाऊसाहेब शेजुळ,राहुल इंगळे,मुन्ना इंगळे,सचिन ढवळे,प्रविण शेजुळ,भाऊसाहेब इंगळे,बाळासाहेब शेजुळ,संतोष देहाङराय,ज्ञानेश्वर रायजादे,प्रभाकर महाले,सुरज देवकर,विजय करपे,विशाल शेजुळ,आंबादास चोथे,गणेश इंगळे,महेश इंगळे,विशाल शेजुळ,महेद्र शेजुळ अनिल वाकचौरे,उत्तम दौंड ,आणि संदिप सोनवणे इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी गेली आठ दिवस पारायणे भसलेल्या सर्व समाजातील महिलांचा सन्मान करण्यात आला महाआरती होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.सूत्रसंचालन किशोर इंगळे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष मा.दत्तात्रय सोनवणे आणि शहराध्यक्ष मा.संजयशेठ पन्हाळे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments