Type Here to Get Search Results !

संभाव्य अप्पर तहसील कार्यालय - वांबोरी, देवळाली प्रवराचे कोणाला वावडे !!

संभाव्य अप्पर तहसील कार्यालय - वांबोरी, देवळाली प्रवराचे कोणाला वावडे  !!


नगर जिल्ह्यात तीन अप्पर तहसील कार्यालय ; राहुरीचे घोडे कोठे अडले !

टीम सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त




टीम सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त 

नगर जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता अप्पर तहसील कार्यालय थाटण्याचा घाट सध्या घातला जात असल्याचे दिसत आहे . यात प्रशासकीय व राजकीय महत्त्वाकांक्षा सोडली तर राहुरीच्या वांबोरी , देवळाली प्रवरा या मोठ्या गावांची उपेक्षा राजकीय अपरिपक्वतेमुळे होते काय ? असा प्रश्न श्रीरामपूर , राहुरी मतदारसंघात राहुरी तालुक्यात विचारला जात आहे .

 नगर जिल्ह्यातील आश्वी , घोडेगाव , राजुर या ठिकाणी सध्या अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा घाट प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर घातला जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे . तशा संबंधित पेरलेल्या बातम्या सर्वत्र सोशल मीडियावर येत आहेत . संबंधित गावे पाहता यातील राजकीय , प्रशासकीय गौडबंगाल तर होत नाही ना ? याविषयी ग्रामीण भागात चर्चा सुरू आहे .

जून 2023 मध्ये शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन झाले . तत्पूर्वी विभाजनानंतर जिल्ह्याचे ठिकाण श्रीरामपूर , संगमनेर , शिर्डी होणार असे चर्चेला जात असे . मात्र अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य महत्त्वाची कार्यालय शिर्डीत रुजू झाल्याने पुढे काय होणार ! हे अपेक्षित होते . लोकसभा विधानसभा निवडणुका नंतर चित्र बदलले आणि राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत चालल्याने आता अप्पर तहसील कार्यालयांची चर्चा सुरू झाली आहे .

लोकसभा , विधानसभा निवडणुका नंतर चित्र बदलले आहे . तशा राजकीय महत्त्वाकांक्षाही वाढत चालल्या आहेत. राहुरी तालुका आणि दोन विधानसभा मतदारसंघातील भाग असलेल्या वांबोरी , देवळाली प्रवरा या सर्वगुणसंपन्न अशा गावांची उपेक्षा मात्र वाढली आहे .

राहुरी हे राहू - केतू यांच्या नावाने प्रसिद्ध आहे . ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक धार्मिक कृषी विषयक व राजकीय दृष्ट्या सामर्थ्यवान ( मास्टर माईंड ) अशा समजल्या जाणाऱ्या राहुरीची मध्यंतरीच्या काळापासून अधोगती व अध:पतन होत आहे की काय ? असे विचारले जात आहे . 

राहुरी तालुक्यातील गावे नगर , शिर्डी लोकसभा मतदारसंघ व राहुरी , श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहे . तालुका विभाजनाचा विचार करता दोन नगरपालिका , देवळाली प्रवरा जोडलेली 32 ते 36 गावे , वांबोरीला जोडलेली 25 ते 30 गावे , पोलीस ठाणे , आरोग्य विभाग , मोठ्या ग्रामपंचायत , नागरिकांशी दैनंदिन संपर्क पाहता अप्पर तहसील कार्यासाठी या दोन्ही गावांची योग्यता आत्तापर्यंत दिसत आलेली आहे . तशी चर्चाही होत असते .

मात्र त्यासाठी राजकीय महत्त्वाकांक्षा महत्त्वाची आहे . आणि नेमकी घोडे इथेच अडल्याचे दिसत असून राहुरीला कोणी वाली आहे की नाही ? असा सवाल विचारला जात आहे .

Post a Comment

0 Comments