Type Here to Get Search Results !

लोणावळ्यातील हेलिकॉप्टरसैर व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा... मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा

लोणावळ्यातील हेलिकॉप्टरसैर व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा...  मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा



टीम सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त  [प्रसाद मैड ]

सध्या नगर जिल्ह्यात हेलिकॉप्टरची क्रेझ चांगली चर्चेत आलेली आहे . आपल्या स्नेही मित्रांनी एखादी वाहन घेतले तरी त्या वाहनात आपल्या मित्रांना प्रवास करण्याचा मोह आवरत नाही . अशाच एका मैत्रीत हेलिकॉप्टर फेरीची क्रेझ नुकतीच लोणावळ्यात दिसून आली .



राहुरीचे भूमिपुत्र असणारे व सध्या लोणावळा लवासा येथील उद्योजक विजय सेठी यांनी नुकतीच हेलिकॉप्टर  खरेदी केले आहे . त्याबाबत राहुरी फॅक्टरी येथे त्यांचा मित्रमंडळी व स्नेही जणांकडून मोठा सन्मानही करण्यात आला .


अशातच राहुरीच्या त्यांच्या स्नेही जणांनी एका कार्यक्रमानिमित्त विजय सेठी यांच्याकडे जाण्याचे जाण्याचा योग आला . यावेळी प्रसिद्ध साई आदर्श मल्टीस्टेट या समूहाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे व त्यांचे मित्र सहकारी सोबत होते .
उद्योजक विजय सेठी यांच्याशी गप्पा मारल्यानंतर सिटी यांच्या हेलिकॉप्टर मध्ये या मित्रांनी लवासा परिसरामध्ये अनोखी अशी सैर केली . या हॅलोकॉप्टर सैरची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे .
साई आदर्श मल्टीस्टेट समूहाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले की , अंबिव्हॅली ..लोणावळा..कार्यक्रम निमित्ताने गेलों होतो .  तिथे आमचे परममित्र उद्योजक विजय सेठी यांची भेट झाली .त्यांनी हेलिकॉप्टर मध्ये आमची सफर केली .. श्री उद्योजक विजय सेठी यांच्या भेटीत साई आदर्श मल्टीस्टेट समूहाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, किशोर थोरात, बाळासाहेब तांबे, रामचंद्र काळे , डॉ.विलास पाटील , आदी समवेत होते . नगर जिल्ह्यात या अनोख्या अशा हेलिकॉप्टर फेरीची सर्वत्र चर्चा होत आहे . राहुरी तालुक्यातील आनंद व्यक्त केला जात आहे .

Post a Comment

0 Comments