शिक्षक आपल्या दारी ","रयत "चा स्तुत्य उपक्रम...
सात्रळ :- ( प्रतिनिधी )
शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी -विद्यार्थिनी शैक्षणिक प्रगती चा आलेख उंचविण्याची जवाबदारी ची जाणीव शिक्षकांचे कर्तव्य असल्याचे ध्येय राबविण्यासाठी सात्रळ येथील "रयत "संकुलामध्ये "शिक्षक आपल्या दारी " अभियान राबविण्यात आले.
परिसरातील विद्यार्थी शिकून मोठा झाला पाहिजे,या सामाजिक जाणीवतून" रयत "चे उपाध्यक्ष अरुण कडू यांनी "शिक्षक आपल्या दारी "ही संकल्पना शाळेतील शिक्षकांपुढे मांडली असता शिक्षक वर्गाने उत्स्फुर्तपणाने सहभाग नोंदविला. या अभियाना अंतर्गत येथील कोंडाबाई कडू कन्या शाळा तसेच ना. स. कडू पाटील विद्यालय मधील शिक्षक शिक्षिका विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थीची शाळेतील उपस्थिती, शैक्षणिक स्थिती याबाबद पालकांशी समक्ष संवाद साधून मार्गदर्शन करत आहेत. या अभियानाचे पालक वर्गाकडून स्वागत होतं असून आपल्या मुलांमुलीची शाळेत अभ्यासाची काय स्थिती आहे तसेच ते शाळेतील उपस्थिती ही समजत आहेत. या अभियानमुळे शिक्षकांचे प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीकडे वैयक्तिक लक्ष असल्याने त्यांच्या शैक्षणिक पातळीत वाढ झाल्याचे चित्र आढळत असल्याचे पालकांचे मत आहे.

Post a Comment
0 Comments