पोलीस स्थापना दिनानिमित्त राहुरी तालुक्यात घेतलेल्या निबंध स्पर्धेत सुमारे 30 शाळांच्या 6000 विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील शाळांमध्ये व वैद्यपूर्ण अशी निबंध स्पर्धा घेण्यात आली याला मोठा प्रतिसाद शाळांतील विद्यार्थ्यांकडून मिळाला शाळा व्यवस्थापन यांनी देखील यात सहकार्य केले .
यातील निबंधाचे विषय
1)स्मार्टफोन-शाप की वरदान
2)वाहतुकीचे नियम
पोलीस विभागामार्फत अनेक गुन्ह्यांचा तपास करताना गुन्ह्याच्या कारक घटकांमध्ये मोबाईलचा दुरुपयोग हा वारंवार दिसून येतो.
राहुरी पोलीस स्टेशन आयोजित पोलीस वर्धापन दिनानिमित्त खालील नमूद शाळांचे विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवला.
1)संत महिपती विद्यालय तांभेरे 2)कै मथुराबाई विश्वनाथ धुमाळ विद्यालय मुसळवाडी 3)नूतन माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा 4)प्रवरा माध्यमिक विद्यालय गुहा 5)नूतन मराठी शाळा नं 3 वाघाचा आखाडा राहुरी 6)नूतन मराठी शाळा नंबर 5,राहुरी स्टेशन. 7)नूतन कन्या शाळा राहुरी 8)नूतन मराठी शाळा नं. 9 येवलेवस्ती 9)नुतन उर्दु शाळा , न.पा राहुरी 10)नूतन मराठी शाळा क्रमांक दोन जोगेश्वरी आखाडा 11)महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय वरवंडी 12)माध्यमिक विद्यालय देसवंडी 14)कै. ज. का. पाटील विद्यालय चिंचोली 15)आदर्श माध्य विद्यालय ब्राम्हण
४. शारीरिक आरोग्यावर परिणाम
स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि मणक्याचे विकार उद्भवू शकतात. व्यायामाचा अभाव आणि सतत बसून राहिल्यामुळे लठ्ठपणा आणि अन्य शारीरिक समस्याही उद्भवतात.
५. सामाजिक संवादाचा अभाव
विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. स्मार्टफोनमुळे एकाकीपणा जाणवतो आणि मित्रमंडळ, कुटुंबाशी असलेला संवाद कमकुवत होतो, ज्याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
उपाय
1. स्मार्टफोनचा वापर अभ्यासासाठी मर्यादित ठेवा.
2. वेळेचे योग्य नियोजन करा आणि निश्चित वेळेसाठीच सोशल मीडिया वापरा.
3. झोपेच्या दोन तास आधी स्मार्टफोन बंद करा.
4. प्रत्यक्ष संवाद वाढवण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा.
स्मार्टफोनचे फायदे आहेत, परंतु त्याचा अतिरेकी आणि अयोग्य वापर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी घातक ठरतो. तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे आणि मर्यादित वापर करणे हेच विद्यार्थी जीवनातील यशासाठी महत्त्वाचे आहे.
या समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने
राहुरी पोलीस स्टेशन मार्फत पोलीस स्थापना दिनाच्या औचित्य साधून तालुक्यातील सुमारे 35 शाळांमध्ये गटविकास अधिकारी श्री मुंडे, शिक्षणाधिकारी श्री तुंबारे नगरपरिषद मुख्याधिकारी श्री ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या समन्वयातून सुमारे 6000 विद्यार्थ्यांची
मोबाईल शाप की वरदान
वाहतुकीचे नियम या विषयावर निबंध स्पर्धा घेऊन मुलांना राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, अशोक शिंदे शकूर सय्यद यांनी मार्गदर्शन केले.
सदर जनजागृती पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.
















Post a Comment
0 Comments