सोनार समाजाच्या प्रश्नावर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सकारात्मक
गोल्ड व्ह्याल्यूर्स असोसिएशन राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
राहुरी ( प्रतिनिधी )
सोनार समाजाला भेडसावणाऱ्या समस्या व मागण्यांवर विधानपरिषदेचे माननीय सभापती प्रा. श्री राम शिंदे सकारात्मक प्रतिसाद दिला .
गोल्ड व्ह्याल्यूर्स असोसिएशन महाराष्ट्रच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी विधान भवनात विधानपरिषदेचे माननीय सभापती प्रा. श्री राम शिंदे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या विषयासंदर्भात माननीय प्रा. श्री राम शिंदेसाहेबाना अनेक समस्यां बाबत अवगत करून मागण्यांचे निवेदन सादर केले. आजची विधानपरिषदेचे माननीय सभापती प्रा. श्री राम शिंदे यांच्या बरोबरची मीटिंग ही कर्जत जामखेडचे आपले व्ह्याल्यूर् श्री शिवानंद कथलेजी यांनी घडवून आणली.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मीटिंगमध्ये यावेळी व्ह्याल्यूर्सच्या मागण्यांचे निवेदन वाचले व सकारात्मक प्रतिसाद दिला. आपण आपल्या समस्यांप्रती आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. यावेळी
गोल्ड व्हॅल्यू वर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ पुरुषोत्तम काळे, कार्याध्यक्ष डॉ राजेंद्र दिंडोरकर, प्रशासकीय सचिव सतीश पितळे, सचिव संजय वाघ, खजिनदार दीपक देवरुखकर आणि टेक्निकल कमिटी प्रमुख सचिन वडनेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments