Type Here to Get Search Results !

गंगाधरराव मुरलीधरराव अन टायगर : संभाजीनगरात मामांचा व्हिडिओ व्हायरल

गंगाधरराव मुरलीधरराव अन टायगर : संभाजीनगरात मामांचा व्हिडिओ व्हायरल 



सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त


गंगाधरराव मुरलीधरराव आणि टायगर नाव ऐकून अचंबित झाला असाल , असं काही नाही बर का !

         या बाबतीत माहिती अशी आहे , संभाजीनगर येथील सुरेश गंगाधरराव उदावंत ( बाळासाहेब) यांची कन्या भक्ती व कामरगाव ( अहिल्यानगर )  येथील ओंकार प्रकाशराव सोनवणे  यांचा  शुभविवाह संभाजीनगर येथे पार पडला .


शुभविवाह निमित्त सुरेश उदावंत ( बाळासाहेब ) यांचा मुलगा गोविंदा याने उदावंत/ सोनवणे आई वडील कुटुंबीय व जवळच्या नात्यातील मंडळीचा एक व्हिडिओ तयार करण्याचे ठरवले आणि ते शक्यही झाले . ज्यावेळी मंगल कार्यालयात हा व्हिडिओ पाहुणे मंडळींना दाखवण्यात आला . त्यातील एक भाग सर्वांना अगदी दक्षिणाट्य चित्रपटातील दृश्यांसारखा हर्ष उल्हास दाखवून गेला .

 नवरी मुलगी भक्ती हिचे आजोबा व संभाजीनगर येथील प्रसिद्ध भाविक मानले जाणार जाणारे गंगाधरराव मुरलीधरराव तथा मामा व मामी यांचा एक व्हिडिओ अगदीच सर्वांच्या नजरेत भरला . यावेळी उपस्थित नातेवाईकांनी या व्हिडिओला दाद दिली.  अनेकांनी हा व्हिडिओ आपापल्या परीने व्हायरलही केला आहे . सध्या याच टायगर का हुकूम व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे .

या व्हिडिओची सध्या संभाजीनगर व उदावंत , सोनवणे परिवाराच्या संबंधित असणाऱ्या नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये चर्चा सुरू आहे .

Post a Comment

0 Comments