रथसप्तमी निमित्त राहुरी योगा समुहाकडुन २२१ सुर्यनमस्कारांची सलामी
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी महाविद्यालय येथे गेले चार ते पाच वर्षांपासून नियमितपणे रोज सकाळी ६ ते ७ या वेळेत न ऊ ते दहा साधक १०८ सुर्यनमस्कार घालतात.आपसातील चर्चेतुन रथसप्तमीस आपण आजपर्यंत घातलेल्या सुर्यनमस्कार जेवढे होतील तेवढे जास्त सुर्यनमस्कार घालायचे जेणेकरून इतरांनी यापासून प्रेरणा घेऊन आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपावे.हा उद्देश त्यामागे आहे.
त्यानुसार रथसप्तमी निमित्त श्री.विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.कड व प्रितम बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राहुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री.ज्ञानेश्वर (माऊली)पोपळघट यांच्या प्रेरणेने जाधव सर, रवि दरक, गिरीशशेठ सुराणा, अनिल निकम,सागर साळवे यांनी ही कामगिरी केली आहे.


Post a Comment
0 Comments