'छावा' चित्रपट पाहण्यासाठी चिमुकले वेशभूषा करून पोहोचले चित्रपगृहात
राहुरी फॅक्टरी येथे प्रेक्षकांत मोठा उत्साह
राहुरी - विशेष वृत्त
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा ऐतिहासिक चित्रपट अखेर देशभर प्रदर्शित झाला आहे.
राहुरी फॅक्टरी येथील विठामाधव सिनेमा गृहात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आज रविवारी वैष्णवी चौक परिसरातील चिमुकल्यांनी चित्रपट पाहण्यासाठी थेट संभाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा धारण करून सिनेमागृहात प्रवेश केला.त्यांच्या आगमनाने उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.
विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच तो चर्चेचा विषय ठरला होता. ऐतिहासिक सत्याच्या विकृतीकरणाच्या आरोपांमुळे काही वाद निर्माण झाले होते, मात्र आजच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
वैष्णवी चौकचे संस्थापक वसंत कदम यांच्या संकल्पनेतून
परिसरातील चिमुकल्यांना छत्रपती संभाजी महाराज,येसूबाई,येसाजी कंक,मावळे,हंबीरराव मोहिते यांची वेशभूषा करून सिनेमागृहात एन्ट्री दिली.यावेळी शिवा कि जय बोलो, संभा की जय बोला घोषणांनी परिसर दणानून सोडला होता.प्रारंभी सिनेमागृहाच्या बाहेर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक पूजन करून आरती संपन्न करण्यात आली. लहान मुले-मुली, माता भगिनी व तरुणांचा मोठा उत्साह यावेळी बघावयास मिळाला. विठामाधव पिक्चर पॅलेसचे सुखदेव मुसमाडे, जयेश मुसमाडे, प्रशांत मुसमाडे यांनी वेशभूषा करून आलेल्या मावळ्यांचे स्वागत केले. यावेळी वैष्णवी चौक परिसरातील नागरीक व मोठ्या संख्यने प्रेक्षक उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments