आता हातोडा नगर मनमाड रस्त्यावरील अतिक्रमणांवर
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त
राहुरी शहरानंतर आता नगर मनमाड रस्त्यावर अतिक्रमणांवर हातोडा पडायला सुरुवात झाली आहे . आज सकाळीच अतिक्रमण हटाव पथकाने नगर मनमाड रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील 30 मीटर मोजणी करत रेषांकन रेषाखंड करायला सुरुवात केली .
अनेक व्यवसायिकांच्या शेड , दुकान यात येत असल्याने त्यांना ती तात्काळ पाठविण्यात सांगितले . यावेळी एन एच ए आय च्या अधिकाऱ्यांसमवेत स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग , राहुरी नगरपालिका तसेच पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू झाली आहे .
दोन दिवसांपूर्वी शहरातील अतिक्रमणांवर राहुरी नगरपालिकेने हातोडा टाकला होता . अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर असलेली आपली अतिक्रमणे यापूर्वीच काढून घेतलेली आहे . नगर मनमाड रस्त्यावरील राहुरी बस स्थानक परिसर , धावडे पंप परिसर , राहुरी बाजार समिती परिसरातील व्यावसायिकांनी आपापली अतिक्रमणे काढत रेषांकन केलेल्या भागाच्या आत आपली दुकाने लावल्याचे चित्र दिसून आले . अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे नगर मनमाड रस्ता आता मोकळा दिसायला सुरुवात झाली असली तरी रस्त्यावरील वाढती ट्राफिक मुळे वाहन चालक व स्थानिक नागरिक हैराण झालेले आहेत .

Post a Comment
0 Comments