नगर - कोपरगाव डबल रेल्वे लाईन : लवकरच होणार हा निर्णय
( संग्रहित फोटो )
सतर्क खबरबात जिल्ह्याची टीम - ( विशेष वृत्त )
मार्च अखेरपर्यंत राहुरी वांबोरी हा टप्पा पूर्ण झाल्यास मनमाड ते निंबळक हे 154 किमी अंतर दुहेरीकरण विद्युतूकरणासहित पूर्ण होईल.
बहुचर्चित व महत्त्वाकांक्षी अशा दौंड मनमाड रेल्वे मार्गावरील डबल लाईनचे काम सध्या वेगाने सुरू असून राहुरी ते वांबोरी या चौदा किलोमीटर अंतरावरील डबल लाईनचे काम रुळ बसवण्याचे काम सुरू आहे .
( संग्रहित फोटो )
रेल्वे मार्गातील वांबोरी विभागात ओवर हेड वायर्स नियमित सुरू होत आहे . 28 फेब्रुवारी 2025 पासून इलेक्ट्रिक कर्षणाची सुरुवात 25 केली एसी किलोमीटर 377.500 पासून किलोमीटर 391.00 पर्यंत म्हणजेच साडेतेरा किलोमीटर सुरू होणार आहे .
( संग्रहित फोटो )
( संग्रहित फोटो )
या दरम्यान लोडिंगची वाहने उंचीचे निरीक्षण करून वाहनांवरील भार उंची मापकांचे उल्लंघन होणार नाही व ओवर हेड वायरच्या संपर्कात येणार नाही याची खात्री करावी , असे आवाहन मध्य रेल्वेने नुकतेच जाहीर निवेदनाद्वारे केले आहे .
नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत पढेगाव ते राहुरी या 14 कि.मी. अंतराची चाचणी मागील दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आली. नगर ते मनमाड रेल्वे मार्गाचे काम लवकरच पुर्ण होणार असून नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. पुर्ण रेल्वेमार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.
मनमाड - कोपरगाव - नगर - दौंड या मार्गावर राहुरी रेल्वे स्टेशन महत्त्वाचे मानले जाते . या रेल्वे स्टेशनवर बाहेरील राज्यातील सुपरफास्ट तसेच पॅसेंजर व अन्य एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा थांबा व्हावा , अशी मागणी साई भक्त व शनि भक्तांकडून सातत्याने होत आहे . मात्र राजकीय अपरिपक्वतीमुळे या महत्त्वाच्या बाबींकडे नेहमीच टाळाटाळ होत आलेली आहे .
या पुर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा, बेलापूर ते पढेगाव, निबळक ते वांबोरी, पुणतांबा ते कान्हेगाव या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यापूर्वी 14 कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता एकूण 135 की. मी. अंतराची चाचणी पूर्ण घेतली आहे.
मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वे गाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागत. मात्र आता हा पुर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे. तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 130 प्रति किमी वेगाने धावणार असल्याने, रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे. ताशी 130 वेगाने धावली रेल्वे या अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत पढेगाव ते राहुरी द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी घेण्यात आली आहे .





Post a Comment
0 Comments