Type Here to Get Search Results !

पालिका प्रशासनावर दबाव येताच शहरातील व्यावसायिकांना धाडल्या नोटीसा

पालिका प्रशासनावर दबाव येताच शहरातील व्यावसायिकांना धाडल्या नोटीसा



राहुरी ( प्रतिनिधी )



राहुरी नगरपालिकेने शहरातील काही अतिक्रमणे काढल्यानंतर आता अनेक दुकानदारांना तात्काळ नोटीसा धाडल्या असून अनेकांनी कारवाईच्या धास्तीने आपापली पक्या पायऱ्या व बांधकामे तोडायला सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे .



सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वत्र पालिका , महापालिका अतिक्रमणे काढून काढण्यासाठी ॲक्शन मोडवर आलेल्या आहेत .


( Advt -  मोरया स्पोर्ट्स नवी पेठेलगत राहुरीतील खेळाचे सर्व साहित्य तत्पर उपलब्ध ऋतिक सुरवसे 8180839323 / कृष्णा वाडेकर 9689790368 )


राहुरी शहरासह नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे . राहुरी शहरातील जुन्या बाजारपेठांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून घरे दुकाने यांची बांधकाम आहेत . अनेकांनी नगरपालिकेच्या नालीवर आपल्या व्यवसायाच्या हिशोबाने बांधकामे केली होती . तत्कालीन पालिका प्रशासनाने यावर सातत्याने डोळेझाक करत आल्याने अतिक्रमणे वाढत गेली . एवढेच नव्हे तर शहर विकास आराखड्याचे ( टाऊन प्लॅनिंग ) अनेक निर्णय यापूर्वीच पालिकेत मंजूर होऊन त्याला कायदेशीर मान्यता देखील घेण्यात आलेली आहे . याची बहुतांश माहिती राहुरी शहरातील अनेकांना अजूनही समजू शकलेली नाही .

गेल्या आठवडाभरापासून शहरातील काही भागातील अतिक्रमणे काढल्यानंतर काहीशी मोहीम थंडावली होती . मात्र नेमका दबाव आल्यानंतर पालिका प्रशासनाने शुक्लेश्वर चौक ते नगर मनमाड रस्ता आणि शुक्लेश्वर चौक ते शिवाजी चौक या भागातील अनेक दुकानदारांना तात्काळ नोटीसा धाडल्या आहेत .

 या नोटिसांमध्ये तीन दिवसात आपली नगरपालिकेच्या हद्दीतील शेड , पायऱ्या व पक्की बांधकामे काढून घेण्यात यावीत असे म्हटले आहे . त्यामुळे या भागातील दुकानदारांनी धास्तीने आपापली पक्की बांधकाम काढायला सुरुवात केल्याचे चित्र आहे .

दरम्यान , पालिकेच्या सूत्रांनी पालिकेवर कोणाचाही व कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट केलेले आहे . आता पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पुढील हालचालीकडे राहुरी शहरातील विशेष करून शुक्लेश्वर मंदिर , चौक रोड , शिवाजी चौक , नगरपालिका परिसर अणि तमाम दुकानदारांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे .

Post a Comment

0 Comments