गीत गाता चल सांस्कृतिक मंचाचे अनिरुद्धांनी गायले होश वालो को खबर क्या बेखुदी क्या चीज है
राहुरी ( प्रतिनिधी )
शिवजयंती निमित्त मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठान अहमदनगर तर्फे गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात.
अहमदनगर आयडॉल चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राहुरी येथील गीत गाता चल सांस्कृतिक मंचच्या अनिरुद्ध कुलकर्णी यांना द्वितीय बक्षीस तर सुनील फडके व प्रवीण शिंगी यांना उ्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
या स्पर्धेत अहमदनगर शहर व जिल्ह्यातील गायकांनी भाग घेतला होता, त्यात शामदास वैष्णव यांना प्रथम पारितोषिक, अनिरुद्ध कुलकर्णी यांना द्वितीय, तर उसामा शेख यास तृतीय पारितोषिक देण्यात आले, तर सुनील भालचंद्र फडके सर, प्रवीण शिंगी, अद्वैत कुलकर्णी, संजय भिंगारदिवे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. इम्रान शेख, अकबर भाई बम्बई वाला, आरिफ सय्यद, सयीद खान, जावेद मास्टर समिल्लाह खान, तन्वीर सय्यद, इत्यादी ने परिश्रम घेतले.
प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आबिद हुसेन यांनी सर्वांचे आभार मानले व एप्रिल महिन्यात या यशस्वी गायकांना सोबत घेऊन" माऊली सभागृह" येथे लवकरच भव्य संगीत कार्यक्रम चे आयोजन करण्यात येईल.
राहुरी येथे गीत गाता मंचचे अन्वरभाई शेख यांचे मार्ग दर्शनाखाली कार्यरत आहे.




Post a Comment
0 Comments