गोल्ड व्हॅल्यूअर असो. सोन्याचे मुल्यांकन कार्यशाळा, मार्गदर्शन मिरजेत संपन्न
मिरज : योगेश कुलथे ( पत्रकार )
आज मला माझा माहेरी आल्या सारखे वाटते, माझा समोर सोनार समुदायातील बंधू भगिनींशी सौवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे,
मी हि आपली एक मुलगी बहिण म्हणून माझे सोनार समाजाला काहीतरी देणे लागत आहे - आमदार चित्राताई वाघ
[ मा आमदार चित्राताई वाघ याचे स्वागत करताना सौ सोनाली पेंडुरकर. सौ अमृता कुलथे अध्यक्ष डॉ पुरुषोत्त्म काळे डॉ राजेंद्र दिंडोरकर सचिव सतीश पितळे संजय वाघ जिल्हा अध्यक्ष योगेश कुलथे जितेंद्र पेंडुरकर ]
गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशनचे दि.२ फेब्रुवारी रोजी मिरज येथे शास्त्रोक्त पद्धतीने सोने मुल्यांकन कसे करावे याचे कार्यशाळा,व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले .
बँकेमधील सर्वात कमी वेळेत ग्राहकांना कर्ज मिळवून देण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे "सोनेतारण कर्ज" आणि या साठी बँकेत सोन्याचे मुल्यांकन करण्यासाठी "गोल्ड व्हॅल्यूअरची" प्यानेल वर नेमणूक केली जाते, अश्या गोल्ड व्हॅल्यूअरना शास्त्रोक्त पद्धतीने सोने मुल्यांकन कसे करावे व कार्यप्रणाली, व्हॅल्यूएशन मध्ये येणाऱ्या अडचणी, बांधीव दागिने कसे ओळखायचे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, सोने तपासणीच्या विविध पद्धती, फोर्मिंग आणि कमी टंचाचे दागिने कसे ओळखायचे, कसोटीचे प्रकार, त्यांचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन. अशा अनेक आणि महत्वपुर्ण विषयाचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी पटवर्धन हॉल मिरज येथे आयोजित करण्यात आले. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपच्या व सोनार समाजाच्या फायर ब्रांड आमदार चित्राताई वाघ या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या सोनार समाजाला संबोधताना चित्राताई वाघ म्हणाल्या आज मला माझा माहेरी आल्या सारखे वाटते, माझा समोर सोनार समुदायातील बंधू भगिनींशी सौवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे, मी हि आपली एक मुलगी बहिण म्हणून माझे सोनार समाजाला काहीतरी देणे लागत आहे, सबब गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन कडून आलेल्या समस्या ,मागण्या सरकार दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे आणि ते मी अवश्य करीन, पुढे ४११,४१२,कलाम बद्दल बोलताना त्या म्हणाल्या हा विषय देवेंद्रजी उप मुख्यमंत्री असताना त्यांनी हा विषय त्याच्या बरोबर चर्चा करून जिल्हा स्तरीय व राज्य स्तरीय दक्षता समिती स्थापन करू त्या व्यपारांचे प्रतिनिधी असावेत अशी समिती गठीत करून ती पोलीस प्रशासनास सहकार्य करेल अश्या प्रकरणात पोलीस अधिकारी हा तपास अधिकारी असावा, तो वसुली अधिकारी नसावा, आम्हा व्हॅल्यूअरना स्थानिक पातळीवरही काही अडचणींना सामना करावा लागतो आम्ही सर्व सराफ-सोनार बँकेच्या प्यानेलवर गोल्ड व्हँल्युअर म्हणून काम पाहत आहोत तरी साध्य बऱ्याच बँकेनि सराफांच्या व्हँल्यूएशन फी वाढवण्याचा ऐवजी कमी करण्यास सुरुवात केली आहे, गेल्या कित्येक वर्षी पासून आम्ही अहे त्या फी मध्ये काम करीत आहोत, बँकेने व्हँल्यूअर्सच्या दृष्टीने कधी विचार केला नाही, त्यामुळे यावर आता खऱ्या अर्थाने विचार करण्याची वेळ आली आहे, सध्याच्या स्थितील वाढती महागाई, आपल्या बँक कर्मचाऱ्यांचे पगार कित्येक पटीने वाढले परंतु आमचे व्हँल्यूएशन फी चार्जेस कमी करण्यात आले आहेत, सध्याचे सोन्याचे वाढते दर त्यामुळे आमची जवाबदारी हि त्या प्रमाणात वाढत आहे, पूर्वी बँक कर्मचारी आमच्या दुकानात येऊन सोने तपासून घेऊन जात असत, पण आता आम्हाला बँकेत बोलावले जाते, व्हँल्यूअर्स आपले दुकान गिर्हाईक सोडून बँकेत जातो तेव्हा गिर्हाईक परत गेले त्याचे होणारे नुकसान, बँकेत येणे-जाणेचा खर्च या व अश्या अनेक बाबींचा विचार करता बँकेकडून मिळणारी फी हि खुपच कमी प्रमणात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन तर्फे बँकेकडे काही मागण्या केलेल्या आहेत. – योगेश कुलथे सांगली जिल्हाध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख)



Post a Comment
0 Comments