या डॉक्टरांनी दिली सबस्टेशनसाठी आपली जागा ; माजीमंत्र्यांनी घातले होते लक्ष - काम अंतिम टप्प्यात
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त
माजी मंत्री प्राजक तनपुरे यांनी त्यांच्या कार्यकाळात पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथील महावितरणच्या सबस्टेशनसाठी प्रयत्न केले होते , त्यात त्यांना यश आले होते . महावितरणच्या सबस्टेशनचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच शिराळ, कोल्हार, चिचोंडी व परिसरातील वाड्यांना अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे.
मविआ सरकारच्या काळात या भागातील शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता, माजी मंत्री व तत्कालीन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मोठ्या आग्रहाने हे सबस्टेशन मंजूर करून घेतले होते.
नंतरच्या काळात, मविआ सरकार पडणे, जागा मालकाने ऐनवेळी जागा द्यायला नकार देणे , आदी कारणांमुळे विलंब होत गेला. परंतु सातत्याने पाठपुरावा करून शेवटी काही महिन्यांपूर्वी या कामाला सुरुवात झाली.
यावर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदार संघातील नागरिकांना आपले मत व्यक्त करत म्हटले की ,
डॉ. घोरपडे यांचे विशेष आभार ! ऐनवेळी जागा मालकाने जागा द्यायला नकार दिल्यावर डॉक्टर घोरपडे यांनी स्वतःची जागा या सबस्टेशनसाठी उपलब्ध करून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना करत प्रचंड पाठपुरावा केला. सरपंच रविंद्र मुळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन ! या नवीन सबस्टेशनमुळे परिसरातील शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येतील ही अपेक्षा. राम कृष्ण हरी ! असे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे .
सबस्टेशनच्या कामाचा अंतिम टप्पा सुरू असल्याने लवकरच शिराळ, कोल्हार, चिचोंडी व परिसरातील वाड्यांना अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे. या भागातील नागरिक , ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे .



Post a Comment
0 Comments