राहुरी फॅक्टरी परिसरात अवैध गावठी कट्टा बाळगताना एक आरोपी अटक ; राहुरी पोलीस स्टेशनची कारवाई
राहुरी विशेष वृत्त
बातमीच्या ठिकाणी सापळा लावून इसम नामे गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज वय-24 वर्ष राहणार गजानन वसाहत राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात तीस हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी पिस्तूल व तीन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत राऊंड मिळून आले. सदर इसमा विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर , मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर ,श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात ASI गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके, सुरज गायकवाड ,राहुल यादव , पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, सचिन ताजने, नदीम शेख, अमोल भांड, भाऊसाहेब शिरसाट नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहिल्या नगर यांनी केलेली आहे.




Post a Comment
0 Comments