Type Here to Get Search Results !

देशाच्या राष्ट्रपतींची आस्थेची त्रिवेणी संगमात आस्थेची डुबकी

देशाच्या राष्ट्रपतींची आस्थेची त्रिवेणी संगमात आस्थेची डुबकी


 प्रयागराज कुंभमेळा - विशेष वृत्त


 भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी जी मुर्मू यांनी आज कुंभमेळाक्षेत्री प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर स्नान केले. 


 सोशल मीडियावर महा कुंभ मानवतेला एकता आणि अध्यात्माता संदेश देते असे म्हटले आहे . महामहीम राष्ट्रपती द्रोपदी जी मुर्मू यांच्या महा कुंभाच्या आस्थेची डुबकीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे .

आज, प्रयागराज महाकुंभाच्या अलौकिक वातावरणात, मला गंगा, यमुना आणि भूमिगत प्रवाह सरस्वती यांच्या पवित्र संगमावर स्नान करण्याची संधी मिळाली. श्रद्धा आणि श्रद्धेचा हा विशाल संगम भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक अद्भुत आणि जिवंत प्रतीक आहे. महाकुंभ मानवतेला एकता आणि अध्यात्माचा संदेश देतो. गंगा मातेला माझी प्रार्थना आहे की ती सर्वांवर आपले आशीर्वाद वर्षाव करत राहो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि शांती आणत राहो.

गेल्या 12 जानेवारी पासून प्रयागराज येथे महा कुंभमेळा मोठ्या भक्ती भावात सुरू असून देशभरासह जगभरातील जवळपास 43 कोटी नागरिकांनी या कुंभमेळात सहभाग नोंदवला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा तसेच अन्य गणमान्य व्यक्तींनी कुंभमेळ्यातील प्रयागराज येथे आस्थेची डुबकी घेतली असून आज राष्ट्रपतींनी कुंभमेळ्यात सहभाग करत देशाच्या एका गौरव परंपरेला जगासमोर एक वेगळा संदेश दिल्याचे म्हटले जात आहे .

Post a Comment

0 Comments