Type Here to Get Search Results !

डॉ. तनपुरे कारखाना - मतदारयादीवर हरकत घेण्याची 12 मार्च पर्यंत मुदत

डॉ. तनपुरे कारखाना - मतदारयादीवर हरकत घेण्याची 12 मार्च पर्यंत मुदत



डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूक



राहुरी  ( प्रतिनिधी )

नगर जिल्ह्यातील बहुचर्चित अशी राहुरीतील डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीचा सध्या विषय चांगलाच चर्चेत आलेला आहे . 


12 मार्च पर्यंत मतदार यादीवर हरकती घेण्याची शेवटची तारीख आहे .



मात्र अनेक सभासदांनीकारखाना कार्यस्थळावर कामगार उपलब्ध नाहीत , असा आक्षेप घेतलेला आहेनिवडणुक प्रक्रियेसाठी कारखान्याने मोठी रक्कम भरूनही अधिकारी जागेवर नाहीत. असे देखील कारखाना कार्यस्थळावर जाऊन सभासदांनी आपले मत व्यक्त केले आहे .

सभासदांची थकबाकी भरून घेण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर कामगारच नसल्याने निवडणूक प्रक्रिया मध्ये तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे . काय घडामोड होत आहे हे 12 मार्च रोजी समजणार आहे  . सध्या डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणुकी संदर्भात सभासद , शेतकरी , कामगार , नेते मंडळी राजकीय वर्तुळ जोरदार चर्चा सुरू आहे .

Post a Comment

0 Comments