Type Here to Get Search Results !

पोलिसांची कारवाई आता खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवरील अनधिकृत सिलेंडरवर

पोलिसांची कारवाई आता खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवरील अनधिकृत सिलेंडरवर 



राहुरी  ( प्रतिनिधी )


 सर्वत्र न्यायालयीन आदेशानुसार अतिक्रमण काढण्याची मोहीम कठोर स्वरूपात दिसून येत आहे . याशिवाय अन्य शासकीय यंत्रणांच्या विविध विभागाद्वारे वेगवेगळ्या स्वरूपात कारवाई सुरू आहे . राहुरी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम शहर व नॅशनल हायवे 160 वर सुरू झाल्यानंतर सर्वत्र चिंता वाढल्याचे दिसून आले . पोलीस यंत्रणेमार्फत दुचाकी , चार चाकी वाहनांवर वेगवेगळे स्वरूपातील कारवाई सुरू झाल्या .  राहुरीतही अशाच प्रकारे पोलीस कारवाई दिसून आली .

आता मात्र राहुरी शहरातील बहुतांश खाद्य विक्रीच्या हातगाड्यांवरील अनधिकृत गॅस सिलेंडरवर पोलिसांनी थेट छापा टाकत कारवाई केली . राहुरी शहरातील नवी पेठ , गोकुळ कॉलनी , नगर कोपरगाव रस्ता , शुक्लेश्वर चौक , आदी ठिकाणी खाद्य विक्री करणाऱ्या स्टॉल , हातगाडी , टपरी मधील गॅस सिलेंडरचे तपासणी करून संबंधित खाद्य विक्री चालक यांच्यावर कारवाई केली तर सध्या या झालेल्या कारवाईनंतर पोलीस यंत्रणा कोणत्या प्रकारे कारवाई करते ? यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .

Post a Comment

0 Comments