सहाय्यक आयुक्ताला 20 हजाराची लाच घेताना पकडले राहुरीत झाली कार्यवाही
राहुरी ( प्रतिनिधी )
मत्स्य प्रकल्पाचे उर्वरित अनुदान मिळवण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्यासाठी मत्स्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो ने सापळा रचून पकडण्याची घटना गुरुवारी घडली.
या घटनेने खळबळ उडाली आहे .
याबाबत अँटी करप्शन ब्युरो च्या युनिट -अहिल्यानगर विभागाकडे तक्रारदार- पुरुष,वय-41 वर्षे यांनी आरोपी* रमेशकुमार जगन्नाथ धडील, वय- 57 वर्ष, धंदा-नोकरी, सहाय्यक आयुक्त, वर्ग-1, मत्स्य व्यवसाय (तांत्रिक), अहिल्यानगर, जि.अहिल्यानगर रा. ए-5, अँक्वा लाईन रेसिडेन्सी, धोंगडे नगर, नाशिक रोड, नाशिक यांच्या विरोधात तक्रार केली होती . यातील तक्रारदार यांची पत्नी व बहीण यांच्या नावे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत भुजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन हा प्रकल्प मंजूर झाला आहे. शासनाच्या अटी व शर्ती प्रमाणे प्रकल्पाचे कामकाज पूर्ण झालेले आहे. तक्रारदार यांची पत्नी यांच्या नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून आज पावतो 3,88,800/- रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच तक्रारदार यांची बहीण यांचे नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून 29,16,000/- रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे. दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्याकरिता प्रस्ताव शासनास पाठविण्याकरता आरोपी लोकसेवक रमेशकुमार जगन्नाथ धडील, सहाय्यक आयुक्त, वर्ग-1, मत्स्य व्यवसाय (तांत्रिक), अहिल्यानगर 40,000/- रुपये लाचेची मागणी करत असले बाबतची तक्रार दि.20/03/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार दि.20/03/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान
आरोपी लोकसेवक रमेशकुमार जगन्नाथ धडील यांनी तक्रारदार यांच्या दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्याकरिता प्रस्ताव शासनास पाठविण्याकरता तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष 30,000/- रुपये लाचेची मागणी केली. दि.20/03/2025 एका कार्यक्रमा ठिकाणी सापळा आयोजित केला असता तक्रारदार यांच्याकडून आरोपी लोकसेवक रमेशकुमार जगन्नाथ धडील यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर बाबत आरोपी लोकसेवक धडील यांचेविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन, जि.अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ *हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे* .
▶️ **सापळा व तपास अधिकारी*
श्री.अजित त्रिपुटे ,
पोलिस उप अधीक्षक , ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.8329701344
या सापळा पथक मध्ये पोलीस अंमलदार संतोष शिंदे, रविंद्र निमसे,बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, विजय गंगुल, चापोहेकॉ.दशरथ लाड यांचा समावेश होता. तर सापळा मदत पथक पोलीस निरीक्षक श्री.राजू आल्हाट, पोलीस अंमलदार उमेश मोरे, गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, चालक पोहेकॉ.हारुण शेख होते . या वेळी मार्गदर्शक मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र,
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,अहिल्यानगर.
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
=================

Post a Comment
0 Comments