Type Here to Get Search Results !

प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा : सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा : सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव



सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त 



प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज केली .

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा जाहीर होताच शिल्पकार राम सुतार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे .

 19 फेब्रुवारी 1925 रोजी जन्म झालेले राम सुतार शिल्पकार म्हणून प्रख्यात झालेले आहेत . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा , अश्वारूढ पुतळा , छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्ण कृती पुतळा , भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा व अन्य राष्ट्रपुरुषांचे अगदी जिवंत दिसणारे शिल्प सर्व स्रोत व प्रसिद्ध आहेत. 

गुजरात मधील केवडीया येथील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्ण कृती पुतळा तयार करण्यात शिल्पकार राम सुतार यांना यश जाते . अगदी वयाच्या शंभरीत प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे .


Post a Comment

0 Comments