... या ही शहराची अर्थव्यवस्था व्हेंटिलेंडर वर येणार
राहुरी - सतर्क खबरबात जिल्ह्याची ( विशेष वृत्त )
आधीच व्हेंटिलेंडर वर असणाऱ्या राहुरी शहर अतिक्रमण हटावमुळे कोमा मध्ये आल्याचे सध्याचे चित्र असून तालुक्यासह मध्यवर्ती ठिकाणामुळे वर्दळीचे ठिकाण व लाखो रुपये दैनंदिन उलाढाल असणाऱ्या राहुरी शहराचे चित्र असे कसे बदलले ? असा प्रश्न राहुरीकरांना पडला आहे .
गेल्या महिनाभरापासून राहुरी शहरात व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 ( नगर मनमाड हायवे ) वरील अतिक्रमणांची चर्चा सुरू होती . अखेर या सर्व अतिक्रमणांवर स्थानिक राहुरी नगरपालिका आणि एन एच ए आय व स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात हातोडा उचलला आहे .
Advt - ( गाळे भाड्याने देणे - हॉल भाड्याने देणे अथवा योग्य किंमत आल्यास विकणे... संपर्क - 9922358386 )
परिणामी सध्या पाच हजारहून अधिक हातावर पोट असणारे मजूर , कर्मचारी , स्थानिक व्यावसायिक यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे .
तिसऱ्यांदा शहर विकास आराखडा तयार करण्यात येऊन तो नगरपालिका सभागृहात तत्कालीन अधिकारी , पदाधिकाऱ्यांच्या हजेरीत मंजूर करण्यात आला . त्यानंतर त्याची कोणतीही माहिती नागरिकांना व्यावसायिकांना माहिती देण्यात आली नाही , समजली नाही , सांगितली ही नाही !! त्यामुळे बाहेरील फ्लोटिंग पोपुलेशन , नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने शहरांमधील उद्योगधंदे व्यवसाय हे सुरू होते .
मध्यंतरी उच्च न्यायालयात राज्यातील अतिक्रमणांबाबत विषय न्यायप्रविष्ट होते . अलीकडच्या काळात निकाल लागल्यावर अतिक्रमण काढण्याचे न्यायालयाने आदेश पारित केले . गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील पालिका , महापालिकांवर प्रशासक म्हणून संबंधित मुख्याधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली काम करत आहेत . राज्यातील विशेषतः नगर जिल्ह्यातील बहुतांश पालिका नगरपरिषदा , नगरपंचायती व महानगरपालिका क्षेत्रात अनेक कामे प्रलंबित आहेत . रस्त्यांचे खड्डे खड्ड्यांमधून देखील रस्ते तयार झालेली आहेत . हे भयावह चित्र असताना न्यायालयीन आदेशानुसार अतिक्रमण हटाव मोहीम जोरदार सुरू आहे . गेल्या 40-50 वर्षात आपले दुकान व्यवसाय आपल्याच हद्दीत असताना तीस फूट - चाळीस फूट - पन्नास फूट - साठ फूट रस्ता सोडावा लागणार असल्याने हा अजब फतवा नेमका कुठून निघाला ? असा जळजळीत सवाल राहुरी शहरातून विचारला जात असून राहुरी नगरपालिका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने याबाबत नागरिकांच्या हितासाठी ही माहिती जाहीर करावी , अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे .
राहुरी शहराचा शहर विकास आराखडा राहुरी पालिका प्रशासनाने सविस्तर जाहीर करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. राहुरी पालिका प्रशासन यावर काय करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे .





Post a Comment
0 Comments