सर्वत्र हंड्रेड डेजचीच चर्चा : कठोर निर्णयांच्या रहस्यामुळे नागरिकांची चिंता कायम
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त
सध्या सर्वत्र हंड्रेड डेज ची चर्चा सुरू असून यामुळे कही खुशी कही गम , आसू आणि हसू , अधोगती आणि प्रगती असे संमिश्र चित्र पहावयास मिळत आहे .
हंड्रेड डेज नावाचा एक सस्पेन्स चित्रपट नाव वाजला होता . चित्रपटाच्या नावाप्रमाणे हंड्रेड डेज ची सध्या चर्चा सुरू आहे .
शासनाने राज्यातील सर्व विभागांना पुढील शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करत अनेक विभागातील प्रलंबित अशा कामांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले आहेत . गेल्या महिनाभरापासून राज्यात बहुतांश विभाग या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात सामील झाले आहेत . त्यातील महत्त्वाचा भाग विविध विभागांतर्गत असणाऱ्या बहुचर्चित , प्रलंबित व न्यायप्रविष्ठ अशा शासकीय जागांवरील अतिक्रमणांचा धगधगता प्रश्न होय .
गेल्या महिनाभरापासून नगरपालिका , महानगरपालिका क्षेत्रापासून ग्रामपंचायत क्षेत्रापर्यंत रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे . राष्ट्रीय महामार्ग वरील अतिक्रमणे तसेच रेल्वे मार्ग लगतची अतिक्रमणे देखील काढली जात आहेत . एवढेच नव्हे तर जलसंपदा विभागांतर्गत धरण क्षेत्र , कालवा क्षेत्र , छोटे जलाशय , या विभागांतर्गत असणारे अतिक्रमणे देखील काढण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे .
याशिवाय आरोग्य विभाग , कृषी विभाग , महसूल विभाग व अन्य विभागांनाही त्यांच्याकडील प्रलंबित प्रश्नांचे निपटारे शंभर दिवसांमध्ये करण्याचे निर्देश आहेत .
मात्र यामध्ये अतिक्रमणांचा विषय महत्त्वाचा असल्याने अनेक ठिकाणी चांगले वाईट प्रसंग पाहावयास मिळत आहे आणि याचा दूरगामी परिणाम पुढील काळात वर्षभर पहावयास मिळणार आहे .
शंभर दिवसांच्या मिनिमम प्रोग्राम मुळे सर्वत्र हंड्रेड डेज या शब्दाची आठवण काढली जात आहे .


Post a Comment
0 Comments