आर्या शिंदेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड ; राहुरीत कौतुकाचा वर्षाव
राहुरी ( प्रतिनिधी )
येथील व त्रिमूर्ती विद्यालयाची विद्यार्थिनी आर्या गणेश शिंदे हिची १९ वर्षाखालील गटासाठी युरोप खंडातील इस्टोनिया देशातील टॅलीन येथे आयोजित जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निवडीनंतर तिचे राहुरी तालुक्यातून कौतुक होत आहे. उद्योजक गणेश शिंदे यांची कन्या असलेल्या आर्या शालेय स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर तिने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेतून जिल्हा, राज्य व देशपातळीवरील स्पर्धेत विविध बक्षिसे जिंकली आहेत. चंद्रपूर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकाविले होते.
तिला प्रशिक्षक संभाजी निकाळजे व आळंदी येथील दिनेश गुंड, आई अश्विनी व वडील गणेश शिंदे आजोबा चंद्रकांत शिंदे काका अविनाश व रवींद्र शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. आर्या हिचा पासपोर्ट व व्हीसा तयार झाला असून, गुरुवारी (ता. २७) कुस्ती स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. २९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत टॅलीन शहरात जागतिक कुस्ती स्पर्धा होणार आहे.आर्या हिचे यशा बद्दल माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे डॉ उषाताई तनपुरे खंडोबा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी अभिनंदन केले.


Post a Comment
0 Comments