बिबट्या आला आढळून पण..... मृतावस्थेत विहिरीत
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी बारागाव नांदूर रस्त्यावरील वाकचौरे वस्ती जवळील एका विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आज सकाळी आढळून आला .
परिसरातील शेतकरी यांना मृत जनावराचा वास आल्यानंतर विहिरीत मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याचे लक्षात आले . वनविभागाच्या पथकाने वाकचौरे वस्तीजवळ धाव घेतली आहे . बहुतेक दोन-तीन दिवसांपूर्वीच विहिरीत बिबट्या पडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे .
गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी तालुक्यातील विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात मानवी वस्तीवर बिबट्यांचे हल्ले व वावर वाढला असून गेल्या आठवड्यात एका पिंजऱ्यात दोन तर अन्य ठिकाणी एक अशी तीन बिबटे पिंजऱ्यात अडकले होते . मात्र या ठिकाणी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे असून ग्रामस्थ व ग्रामीण भागातील नागरिक धास्तावलेले आहेत .वनविभाग देखील बिबट्यांच्या मोठ्या प्रमाणातील वावर असल्याने हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही बिबट्यांच्या प्रश्न जातीने लक्ष घातलेले आहे


Post a Comment
0 Comments