अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती ; त्या दोन व्यक्तिमत्त्वांविषयी व्यक्त होत आहे कृतज्ञता जगताप सर दत्ता भाऊ भागवत
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त
राहुरी शहराचा आता मोठ्या प्रमाणात विस्तार होत चालला आहे . मात्र राहुरीकर म्हणून ओळख असणाऱ्यांना विद्या मंदिरचे जगताप सर आणि महाराष्ट्र लॉटरी व मेडिकलचे दत्ताभाऊ भागवत माहित नाही असं शक्यच होणार नाही !
दुर्दैवाने या दोन्ही राहुरीकर व्यक्तिमत्त्वाचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे . त्यानिमित्ताने सोशल मीडियावर त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे .
विद्यामंदिर प्रशाला राहुरीचे मध्ये नेहमी कला व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी घडवत विद्यामंदिर प्रशाला विद्यालयाचे नाव राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मिळून देण्याचे काम कै जी . जी. जगताप सर यांचा मोलाचा वाटा आहे .
एका संपुर्ण पिढीला शिस्तबद्ध जीवन जगायला शिकवणारे द्रोणाचार्य अशी त्यांची ओळख होती.
सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थी असो किंवा सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक शक्ती असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थी असो सर्वांसाठी एकसमान न्याय असणारे ,केवळ सरांनी भेटायला बोलावले आहे म्हणून दरदरून घाम फुटणारे विद्यार्थी आम्ही अनुभवले आहेत, आज सरांचे विद्यार्थी देशभरातच नव्हे तर विदेशातही यशस्वी आयुष्य जगत आहेत आणि सर्वांच्या मनात सरांबद्दल तोच आदर, तोच धाक आणि तोच दरारा सरांच्या सेवानिवृत्ती नंतरही कायम आहे, आमचे संपुर्ण कुटुंब वक्तशीर घडवण्यात मोलाची भुमिका असणारे शालेय जीवनातील गुरुवर्य जगताप सरांना भावपुर्ण श्रद्धांजली... अशा भावना व श्रद्धांजली पर पोस्ट केल्या जात आहेत.
जुन्या पिढीतले दत्ताभाऊ तथा जनता मेडिकल शिवाजी चौकातील दत्ताभाऊ भागवत यांचे नुकतेच निधन झाले . त्यांना ओळखत नाही असेही राहुरीत शक्य नाही. त्यांच्या निधनानंतरही सोशल मीडियावर जगताप सर व दत्ताभाऊ यांच्या विषयी भावपूर्ण आशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर होत असून या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे .
दत्तात्रय प्रभाकर उर्फ दत्ताभाऊ भागवत यांचे मंगळवार दिनांक 25.3.2025 रोजी सकाळी आकस्मिक निधन झाले. ही आमच्या आयुष्यातील खूप वाईट घटना घडली. आमच्या घरातील खुप शांत व संयमी व्यक्तीमत्व आम्हाला सोडून गेले. आमच्या भागवत परिवारातील सर्वांना खूप मोठं दुःख झाले.ते देवमाणूस होते, ह्या समयी सर्व बांधवांनी आमच्या कुटुंबाला खूप आधार दिला दत्ताभाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी श्रद्धांजली दत्ताभाऊ चे पुतणे डॉ. कौस्तुभ भागवत यांनी व्यक्त केले आहे .


Post a Comment
0 Comments