Type Here to Get Search Results !

हे आय. ए.एस. अधिकारी असणार अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी

 हे आय. ए.एस. अधिकारी असणार अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी



सतर्क खबरबात जिल्ह्याची - ( विशेष वृत्त )

अहिल्यानगरचे नव्याने जिल्हाधिकारी म्हणून डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त आहे . डॉ. पंकज आशिया ( आयएएस ) यापूर्वी यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते .



अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची नुकतीच बदली झाल्यानंतर नव्याने कोण येणार याची उत्सुकता अहिल्यानगर जिल्ह्यात लागली होती .



मूळचे राजस्थान मधील जोधपूरचे डॉ. पंकज आशिया 2016 च्या (आय ए एस ) बॅचचे अधिकारी आहेत .

गेल्या महिनाभरापासून नगर शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यात अतिक्रमण व अन्य महत्त्वाच्या विषयांचा जोरदारपणे ऊहापोह सुरू आहे . त्यातच मार्च एंड म्हणजेच मार्च अखेर सुरू असल्याने नव्याने नियुक्त झालेले जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासमोर नक्कीच सर्व आव्हाने असतील सध्या याचीच चर्चा सुरू आहे .

Post a Comment

0 Comments