Type Here to Get Search Results !

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना छावा चित्रपटाची पर्वणी

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना छावा चित्रपटाची पर्वणी





राहुरी   ( प्रतिनिधी )

    जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या  


डॉ. सौ.  उषाताई प्रसादराव तनपुरे यांच्या उपस्थितीत महिला दिनानिमित्त महिला वर्गांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित छावा हा चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली .


राहुरी शहरातील तनपुरे गल्ली येथे भव्य दिव्य एलईडी स्क्रीनवर आज शुक्रवार दिनांक ०७/०३/२०२५ रोजी संध्याकाळी ठीक ९.०० वाजता मळगंगा देवीच्या प्रांगणात दाखविण्यात येणार आहे .

याशिवाय तनपुरे वाडी येथील युवा नेता रवींद्र हिराचंद तनपुरे , रवींद्र भास्कर आहेर आणि प्राजक्त दादा तनपुरे मित्र मंडळाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन येथे देखील महिला दिनानिमित्त भव्य अशा स्क्रीनवर छावा  हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे . तरी समस्त महिला वर्गाने याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सौ. उषाताई तनपुरे , माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे मित्र मंडळ तनपुरे वाडी, मळगंगा ग्रुप माळी गल्ली,राहुरी वतीने करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments