31 वर्षानंतर 80 मित्र मैत्रिणी भेटले एकत्र : शालेय आठवणींना दिला उजाळा
राहुरी ( प्रतिनिधी )
कार्यक्रमाची सुरुवातच अतिशय सुंदर रांगोळीने सजलेल्या प्रवेशद्वाराने झाली.
रिसॉर्टमधील हॉलमध्ये आकर्षक सजावट करून एक आपुलकीचं वातावरण तयार करण्यात आलं होतं.
जणू काही काळ थांबलेला होता आणि सर्वजण पुन्हा एकदा विद्यार्थी दशेतील त्या निरागस दिवसांत गेले होते.
31 वर्षांनंतर मित्र-मैत्रिणींची झालेली ही भेट प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद झळकवत होती. यावेळी सर्वांनी आपापला परिचय दिला आणि गेल्या तीन दशकांत घेतलेला प्रवास शेअर केला. काहींना त्यांच्या विशेष कार्यासाठी भेट वस्तू देऊन गौरविण्यात आलं. सर्व उपस्थित मित्रांना भेटवस्तू देऊन गेट-टुगेदरची आठवण अधिकच खास करण्यात आली.
कार्यक्रमात खेळांची धमाल, आणि गप्पांची रेलचेल होती. जेवणाच्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे सर्वांच्या समाधानात भर पडली. या समारंभाचे नियोजन ॲडव्होकेट पल्लवी कांबळे आणि त्यांच्या व्यवस्थापन टीमने अत्यंत सुबकतेने व उत्साहाने पार पाडले.
हा दिवस सर्वांच्या मनात एक अविस्मरणीय आठवण म्हणून कोरला गेला. सर्व मॅनेजमेंट टीमने केलेल्या नियोजनबद्ध व विशेष परिश्रमामुळे नक्कीच आजचा कार्यक्रम यशस्वी झाला . यावेळी पल्लवी कांबळे , शिवप्रसाद कोकडे , महादेव बडे , प्रवीण पगारे , अशोक कदम , नानासाहेब वराळे , रमेश म्हसे , अर्चना भट्टड ,
निसार आतार , मंगेश बोरकर यांनी काम पाहिले .
ॲड पल्लवी कांबळे , प्रतिभा काळे पाटील, श्री सुनील रोकडे, श्री किरण रोकडे, समीर शेख, श्री रवींद्र लांबे
यांचे उत्कृष्ट कार्य गौरव म्हणून सत्कार करण्यात आले .






Post a Comment
0 Comments