राहुरी शहरात अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल ; निमित्त अग्निशमन सेवा सप्ताह - राहुरीत आयोजन
राहुरी ( प्रतिनिधी )
अग्निशमन सेवा सप्ताह निमित्त राहुरी नगरपरिषद, राहुरी, देवळाली नगरपरिषद, श्रीरामपूर नगरपरिषद, राहता नगरपरिषद, यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी नगरपरिषद, अग्निशमन केंद्र येथे अग्निशमन सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांचे स्वागत राहुरी नगरपरिषदेचे अग्निशमन विभागप्रमुख श्री. राजेंद्र पवार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे एस ओ श्री. हेमंत कार्ले साहेब होते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राहता नगरपरिषदेचे श्री.अशोक साठे साहेब हे होते.
12 वर्षे अभिमानाचे - अर्थ विश्वासाचे - प्रेरणा मल्टीस्टेट (Advt)
( Advt )
तसेच देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे अग्निशमन प्रमुख श्री.भारत साळुंके साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना शोध व बचाव मोहीम विषय अंतर्गत मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवळाली नगरपरिषदेचे श्री.भारत साळुंके साहेब यांनी केले.अध्यक्ष सूचना श्री.पराग कुलकर्णी यांनी केली, अनुमोदन श्री.विलास गडाख यांनी केले, यावेळी उत्कृष्ट अग्निशमन कर्मचारी व अधिकारी यांना मेडल देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप अग्निशमन प्रमुख राजेंद्र पवार यांनी केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुरी नगरपरिषदेचे श्री.विलास गडाख, श्री.बाळासाहेब पवार, श्री. नंदू मोरे, श्री.बाळासाहेब गारुडकर, श्री.अमोल गिरगुने, श्री.आशिष गायकवाड, श्री.भरत गायकवाड, श्री.संतोष त्रिभुवन आदींनी परिश्रम घेतले.








Post a Comment
0 Comments