विरोधी पक्षनेत्यांनी लिंबूपाणी देत प्राजक्त तनपुरेंचे उपोषण सोडले ; "ते" कोणीही फिरकले नाही
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी येथे शिवरायांच्या पुतळा विटंबनी प्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे सुरू असलेले बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरा सुटले .
राहुरी येथे सुरू असलेले उपोषण विरोधी पक्षनेते श्री रावसाहेब दानवे , श्री बाळासाहेब थोरात , नगर दक्षिणचे खासदार श्री निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन सोडण्यात आले . याप्रसंगी उपोषणकर्ते तालुक्याचे माजीमंत्री प्राजक्त तनपुरे , सुरेश शेठ वाबळे , सुरेश निमसे , बाबासाहेब भिटे , प्रशांत विजय डौले , सौरभ ऊंडे , गणेश आघाव, किरण गव्हाणे, पप्पु माळवदे, पप्पु कल्हापुरे, पांडु उदावंत, धनु म्हसे, अशोक कदम , तसेच सर्व उपोषणकर्ते व समर्थक नागरिक उपस्थित होते .
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पुढील दोन दिवसात आरोपींना जेरबंद करण्यात येईल , असे आश्वासन दिले . यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते . बेमुदत राहुरी बंद पुकारण्यात आला होता . उपोषण सुटल्याने उद्याचा राहुरी चा आठवडे बाजार सुरळीत राहणार असल्याचे व्यापारी असोसिएशनने काढलेल्या जाहीर केले आहे .



Post a Comment
0 Comments