Type Here to Get Search Results !

तनपुरेंच्या बेमुदत उपोषणाला वाढता पाठिंबा ; उद्यापासून राहुरी बेमुदत बंदचा इशारा

तनपुरेंच्या बेमुदत उपोषणाला वाढता पाठिंबा ; उद्यापासून राहुरी बेमुदत बंदचा इशारा

 राहुरी ( प्रतिनिधी )



शिवरायांच्या पुतळा विटंबना प्रकरणी अद्यापही आरोपी सापडत नसल्याने रोष वाढत चालला असून उद्यापासून राहुरी बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला आहे .



 माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे . कालपासून आईन उन्हातानाच तनपुरे बेमुदत उपोषण करीत असल्याने त्यांच्या तब्येतीची चिंता वाढली आहे .



प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणाच्या पहिल्या दिवशी अनेकांनी पाठिंबा दिला . रात्रभर तनपुरे उपोषण स्थळी तळ ठोकून होते . आज दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने विविध संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त केला असून प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे .


दरम्यान , या प्रकरणातील आरोपी सापडत असल्याने उद्यापासून राहुरी बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला आहे .

माजी राज्यमंत्री यांचे उपोषण सुरू असूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे चित्र दिसून येत आहे . 


     वीस दिवसांपूर्वी राहुरीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याप्रकरणी प्रशासनाला अजूनही आरोपीचा शोध लागत नाही .

 अनेक संघटनांनी प्रशासनाकडे या विटंबना प्रकरणातील आरोपी जेरबंद करावा , या मागणीसाठी आंदोलने केली . मात्र अद्यापही यातील आरोपी पोलीस शोधून काढू शकले नाही . माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर बेमुदत उपोषणाचा मार्गाचा अवलंब केला .


  राहुरी शहरातील प्रसिद्ध राहू केतू शनी मंदिराशेजारी तनपुरे शेकडो शिवप्रेमींसह बेमुदत उपोषणाला बसले . अनेक स्थानिक संघटनांनी या बेमुदत उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. उशिरापर्यंत याबाबतीत पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नसल्याचे दिसून आले आहे . पोलीस व प्रशासना सोबतच शासनाविरोधात राहुरीत रोष व्यक्त केला जात आहे . राज्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या गंभीर घटने बाबत संताप व्यक्त केला जात असून तनपुरे यांच्या उपोषणाची दखल सरकार घेत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे .

Post a Comment

0 Comments