Type Here to Get Search Results !

वांबोरी , राहुरी रेल्वे स्टेशनच्या जंक्शनची क्षमता असताना कोणाला ऍलर्जी ? जोरदार चर्चा

वांबोरी , राहुरी रेल्वे स्टेशनच्या जंक्शनची क्षमता असताना  कोणाला ऍलर्जी ? जोरदार चर्चा

 सतर्क खबरबात जिल्ह्याची  - विशेष वृत्त

छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर संभाव्य रेल्वेमार्ग चर्चेत आला असून या रेल्वेमार्गामध्ये वांबोरी रेल्वेस्टेशनचे नाव आल्याने पुन्हा एकदा राहुरी चर्चेत आले आहे .

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दौंड - मनमाड रेल्वेमार्ग दुपदरीकरण , राहुरी - शनिशिंगणापूर मार्ग सर्वेक्षण यानंतर आता छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर रेल्वे संभाव्य रेल्वेमार्ग चर्चेत आला आहे. 


दरम्यान , शनिशिंगणापूर पुढे डोंगरमाळा चा अडथळा येणार असल्याने वांबोरी या रेल्वे स्टेशन चा पर्याय सर्वेक्षणात नमूद करण्यात आल्याचे समजते . त्यामुळे छत्रपती संभाजी नगर - अहिल्यानगर या रेल्वे मार्गात वांबोरी रेल्वे स्टेशन महत्त्वाचे केंद्र होऊ शकते. या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार असून मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्र पर्यटन तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने जोडण्यात येऊ शकतो . त्यामुळे राजकीय प्रशासकीय महत्त्वाकांक्षा ही महत्त्वाची ठरणार आहे . सध्या राहुरी तालुक्यात याची चर्चा सुरू आहे .

गेल्या काही वर्षापासून आंतरराष्ट्रीय धार्मिक क्षेत्र शिर्डी , शनिशिंगणापूर ही पर्यटनाच्या संधी झाल्या आहेत . त्यामुळे राज्य व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून या धार्मिक क्षेत्रांना रस्ते , रेल्वे आणि हवाई मार्गाने कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत . असे असले तरी अनेक बाबतीत राहुरी तालुक्याला सांस्कृतिक ,राजकीय ,सामाजिक ,कृषी विषयक व अन्य विषयक सोईस्कर डावलले जाते . विशेषतः या सर्व बाबतीत राहुरी हे मध्यवर्ती केंद्र मानले जाते हे विशेष आहे .

 पूर्वी राहुरी रेल्वे स्टेशनला ब वर्गाचे वेटिंग रूम , जलद गाडय़ांना थांबा, अलीकडच्या काळात राहुरीतील राहू केतू शनी मंदिर चर्चेत आलेले आहे. तेथेही बाहेरील भाविकांचा ओघ वाढला आहे .

पुढील काही काळात दौंड नगर मनमाड या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वास येईल . राहुरी - शनिशिंगणापूर सर्वेक्षण नुकतेच पार पडले . त्यातच आता नव्याने छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर या रेल्वेमार्गाची चर्चा सुरू होत आहे.  

या रेल्वे मार्गासाठी तीन सर्वेक्षण झाले आहेत . 19 एप्रिल 2025 रोजी छत्रपती संभाजी नगर येथील रेल्वे कार्यालयात दक्षिण मध्य रेल्वे , मध्य रेल्वे व अन्य विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. यात छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर या 85 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या झालेल्या तीन पैकी एका सर्वेक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येते .

डॉ. कराड यांच्या झालेल्या बैठकीत या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या देण्यात आल्या. छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर या रेल्वे मार्गासाठी 3200 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून 600 हून अधिक हेक्टर जमिनीचे भूसंपादन होऊ शकते . रेल्वे मार्गावर संभाजीनगर जिल्ह्यातील शरणापुर ,आंबेगाव, गंगापूर तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र देवगड, नेवासा ,उस्थळ दुमाला ,श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर या रेल्वे स्टेशनचा समावेश आहे .

Post a Comment

0 Comments