युवानेता विक्रम भुजाडी यांची भाजपाच्या राहुरी मंडल अध्यक्षपदी निवड
राहुरी विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवडी .
राहुरी :
राहुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांची निवडी दि. 20 रोजी राहुरी येथे करण्यात येऊन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस संतोष मस्के व राहुरी शहर निवडणूक निरीक्षक रभाजी सुळ यांसह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर भाजपने संघटनात्मक बांधणीसाठी संघटन पर्व हाती घेतले आहे. या संघटन पर्वाचा आढावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. भाजपमध्ये लोकशाही पद्धत राबवून ही निवड प्रक्रिया होत असते.संघटन पर्वाअंतर्गत भाजपचे दीड कोटीहून अधिक प्राथमिक सदस्य आणि १ लाख ३४ हजारांहून अधिक सक्रिय सदस्यांच्या नोंदणीचे विक्रमी लक्ष्य साध्य करून महाराष्ट्र भाजपचे सदस्य नोंदणी अभियान ऐतिहासिक ठरले असून त्या दृष्टीने पक्षाची बांधणी सुरू आहे.
पक्ष तळागाळात पोहोचण्यासाठी मंडल पदाची संकल्पना पुढे आली व या दृष्टीने पक्षाने राहुरी तालुका विधानसभा मतदारसंघातील पाच मंडळ अध्यक्ष पदाची निवड या प्रसंगी घोषित केली. यामध्ये राहुरी मंडल अध्यक्षपदी विक्रम प्रदीप भुजाडी, नांदूर_सात्रळ मंडळाध्यक्षपदी युवराज साहेबराव गाडे, वांबोरी ब्राम्हणी मंडलाध्यक्षपदी धनंजय आढाव,वाळकी_चिंचोडी मंडलाध्यक्ष पदी दादा पाटील दरेकर व जेऊर -नगरदेवळे मंडलाध्यक्षपदी राम पानमळकर यांची निवड यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस संतोष म्हस्के,राहुरी शहर निवडणूक निरीक्षक रभाजी सुळ, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे,राजेंद्र उंडे, राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश बानकर,राजेंद्र वाडेकर, गोपीनाथ येवले,राम शिंदे, अरुण डौले, सुरेश बांदकर ,युवराज गाडे,धनंजय आढाव,आर आर तनपुरे, सचिन मेहेत्रे, उमेश शेळके, शरद येवले, किशोर येवले, काकासाहेब आडागळे,जितू बर्डे, दत्तात्रय गायकवाड, भारत सुरेश भुजाडी, मेजर अविनाश बनकर, योगेश काळे, नामदेव आढाव, आबासाहेब येवले, समीर पठाण,राजेंद्र गोपाळे, अनिल पवार, अक्षय भुजाडी, प्रसाद पवार,राजेंद्र गायकवाड, प्रदिप भुजाडी, रविंद्र म्हसे सचिन पानसंबळ अदि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भनगडे यांनी मानले.


Post a Comment
0 Comments