माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून सोलर प्लॅन्ट ट्रांसफार्मर माध्यमातून अनेक गावांत दिवसा वीज पुरवठा सुरू
राहुरी ( विशेष प्रतिनिधी )
आरडगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्पातून केव्हा वीज पुरवठा सुरळीत होतो याकडे शेतकऱ्यास ग्रामस्थांचे लक्ष लागले होते. मध्यंतरी अनेक घडामोडी घडून हा प्रकल्प चर्चेत ही आला होता.
अखेर मंगळवारी आरडगाव सौर ऊर्जा प्रकल्पातून शंभर ट्रांसफार्मर च्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला. आता हा ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना दिवसा विज मिळावी ही महत्त्वाची मागणी लक्षात घेता तत्कालीन राहुरीचे आमदार व महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदार संघात सुमारे 6 ऊर्जा प्रकल्पांना तत्वतः मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दिला होता.
त्यामध्ये आरडगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प होता. मध्यंतरी सरकार बदलले निधीची कमतरता पडली, अशा अनेक बाबी घडल्या, गेल्या सहा महिन्यापूर्वी प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन देखील यातून वीज पुरवठा सुरू झाला नव्हता. म्हणून गेल्या महिन्यात आरडगाव येथे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले होते यावेळी दहा दिवसात हा प्रकल्प सुरू करण्याचे मुदत देण्यात आली होती. अखेर मंगळवारी या सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्या 100 ट्रांसफार्मर च्या माध्यमातून दिवसा वीज मिळेल यामध्ये आरडगाव फिडर सकाळी साडेआठ ते साडेचार पर्यंत व गणपत वाडी मानोरी फिडर सकाळी साडेनऊ ते साडेपाच पर्यंत चालू राहील. आरडगाव सब स्टेशन वरील सर्व फिडर ला येणारे दोन तासाचे लोड शेडिंग आता बंद होणार आहे. दिवसा सिंगल फेज पुन्हा पुरवत चालू होईल. आरडगाव गावठाण व मुसळवाडी गावठाण 24 तास चालू राहील.



Post a Comment
0 Comments