🚩 शिवपुण्यतिथी निमित्त रायगडावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन 🚩
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी किल्ले रायगडावर येणार
विश्व संवाद केंद्र - पुणे ( विशेष वृत्त )
▪️पुणे - किल्ले रायगड येथे शनिवार दि. १२ एप्रिल ला ३४५ व्या शिवपुण्यतिथी तसेच शिवसमाधी जीर्णोद्धाराच्या शताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री. अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
▪️लोकमान्य टिळकांनी १८९५ मध्ये स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या बतीने छत्रपती शिवाजी महाराजांना ३४५ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. चैत्र पौर्णिमा, शके १९४७ शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ ला किल्ले रायगड येथे हा उपक्रम होणारा आहे मंडळाच्या पुढाकाराने १९२६ मध्ये शिवसमाधीचा जीर्णोद्धार केला होता , त्याला आता १०० बर्षे पूर्ण होत आहेत. यंदा या कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मंडळातर्फे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 'श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार’ दुर्ग अभ्यासक निळकंठ रामदास पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंह होळकर आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी (PVSM, AVSM, SC, SM, VSM) यांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे आदल्या दिवशी ११ एप्रिलला समाधीला दीपवंदना दिली जाणार आहे. जगदीश्वर प्रांगणात कीर्तन आणि जागर होणार आहे. राजसभेत शाहीर सुरेशराव सूर्यवंशी यांचा 'ही रात्र शाहिरांची' हा कार्यक्रम सादर होणार आहे. किल्ले रायगडावरील या कार्यक्रमास ११, १२ एप्रिल २०१५ रोजी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. (सोबत निमंत्रण पत्रिका जोडली आहे.)
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ
संपर्क - श्री. सुधीर थोरात 9422016539 श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ
(sudhirsthorat@gmail.com)



Post a Comment
0 Comments