Type Here to Get Search Results !

महात्मा फुले चौकाची कहाणी ; कै. सचिन भाऊंच्या आठवणीने आले डोळ्यात पाणी

महात्मा फुले चौकाची कहाणी ; कै. सचिन भाऊंच्या आठवणीने आले डोळ्यात पाणी


डॉ. किशोर खेडेकर राहुरी - विशेष वृत्त



मित्राची स्वप्नपूर्ती..



अत्यंत कमी वयात महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने भारावलेल्या एका तरुणाने तत्कालीन (सन २००६) राहुरी शहराच्या दृष्टीने थोडेसे बाहेर असणाऱ्या नाका नं.५, स्टेशन रोड येथील चौक सदृश्य जागेची निवड करून त्या जागेला महात्मा फुले चौक असे नामकरण करण्यासाठी प्रशासकीय लढा सुरू केला .




माळी समाजाच्या एकत्रीकरणासाठी अखिल भारतीय संत सावता माळी युवक संघाची स्थापना करून त्याच्या शाखा राज्यभर उभ्या केल्यानंतर तो राज्याबाहेर पडला,

राजस्थान गुजरात इत्यादी ठिकाणी युवक संघाच्या शाखा सुरू झाल्या .

कुटुंबाकडे, आर्थिक परिस्थिती कडे संपुर्ण दुर्लक्ष करत तो फिरत राहिला .

दरवर्षी न चुकता महात्मा फुले जयंती आणि महात्मा फुले यांची पुण्यतिथी त्याच्या जन्मगावी अर्थात राहुरी शहरात साजरी करण्यासाठी तो उपस्थित असायचा,

महात्मा फुले चौकाची साफसफाई करण्यापासून सर्व कामे तोच स्वतःच्या हाताने करायचा,

कालांतराने शहर वाढू लागले तसतसे किंचित शहराबाहेर असणारा महात्मा फुले चौक शहराच्या मध्यवर्ती भागात आला आहे .

शहरीकरणाच्या सर्व खुणा शहरभर दिसू लागल्या तसतसे महात्मा फुले चौक सुशोभिकरणाची चर्चा सुरू झाली .


माजी राज्यमंत्री मा.प्राजक्तदादा तनपुरे, मा.श्री.अरुण साहेब तनपुरे, तसेच राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.ज्ञानेश्वर ठोंबरे साहेब यांच्या संकल्पनेतून राहुरी शहराच्या मध्यवर्ती भागात आज महात्मा फुले चौक अत्यंत सुंदर पद्धतीने बनून त्याचा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे .


परंतु हे स्वप्न पाहणारा आमचा मित्र कै.सचिन भाऊसाहेब गुलदगड याचे मागील वर्षी रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने तो आज हा लोकार्पण सोहळा पाहू शकणार नाही .

२००६ पासून एक सामाजिक स्वप्न जगत ते पूर्णत्वास नेण्यासाठी लढणाऱ्या आमच्या मित्राला स्वप्नपूर्तीच्या दिवशी भावपुर्ण श्रद्धांजली..


डॉ.किशोर खेडेकर,

राहुरी..

Post a Comment

0 Comments