Type Here to Get Search Results !

राहुरी तालुक्यातील "त्या" संस्थेच्या करोडमोलाच्या मालमत्तेची विक्री होणार का ?

राहुरी  तालुक्यातील  "त्या"  संस्थेच्या करोडमोलाच्या मालमत्तेची विक्री होणार का ?



सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त

सध्या डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे . बंद पडलेल्या याच साखर कारखान्याच्या संदर्भात जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा प्रसिद्ध झालेल्या आहेत .


कारखाना कामगारांचे प्रश्न हा सर्वात मोठा प्रलंबित प्रश्न आहे . त्यातच सध्या वेगवेगळ्या गटांकडून निवडणुकीवर लक्ष केंद्रित होत असल्याचे चित्र आहे . अशा परिस्थितीत राहुरी तालुक्यातील "त्या" संस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा व लेखी नोटीस नुकतीच प्रसिद्ध झाली आहे .

या प्रकरणी उच्च न्यायालयात वाद न्यायप्रविष्ठ असल्याचे समजते .
संबंधित शासकीय विभागाकडून मे महिन्यात त्या संस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे .

ही सर्व प्रक्रिया अत्यंत सावध पणाने सुरू असून यामधील अडथळ्यांवर मात करण्यासाठी विशेष यंत्रणा चांगलीच कार्यरत झालेली आहे . 
सदर जप्त केलेली मालमत्ता मोक्याच्या ठिकाणी असल्याने चर्चेला मात्र उधाण आलेले आहे .
बंद पडलेल्या डॉ. तनपुरे कारखाना निवडणुकीकडे सभासद , कामगारांचे लक्ष लागलेले असताना तालुक्यातील "त्या" संस्थेच्या जप्त मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेला विरोध होणार काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Post a Comment

0 Comments